27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeMaharashtraयुवासेना सचिव दुर्गा भोसले - शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

युवासेना सचिव दुर्गा भोसले – शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्या सौ. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी निघालेल्या जनप्रक्षोभ मोर्चात सहभागी झालेल्या युवा सेनेच्या रणरागिनी म्हणून परिचित असलेल्या अॅड. सौ. दुर्गा भोसले-शिंदे यांचे मोर्चानंतर रात्रौ उशीरा रूग्णालयात दुःखद निधन झाले. मोर्चादरम्यान चालताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले होते. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अॅड. दुर्गा भोसले यांची प्राणज्योत बुधवारी रात्री उशीरा र मालवली. या धक्कादायक घटनेनंतर शिवसेना परिवारावर शोककळा पसरली आहे. अंत्यदर्शन घेताना उद्धव ठाकरेंच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांना अश्रु अनावर झाले.अॅड. दुर्गा भोसले-शिंदे या युवा सेनेच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र आणि दि ग्रेट मराठा लिडर म्हणून परिचित असलेले केशवराव भोसले यांच्या दुर्गा या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दुर्गा यांच्या निधनाचे वृत्त सकाळी खेड आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कळताच अनेकांना धक्का बसला. भोसले परिवाराच्या अनेक हितचिंतकांनी खेडहून मुंबईला धाव घेतली.

*युवा सेनेच्या रणरागिणी*
युवासेना परिवारातील हरहुन्नरी कर्तृत्ववान रणरागिणी म्हणून दुर्गा भोसले-शिंदे यांची ओळख होती. त्या बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात निघालेल्या जनप्रक्षोभ मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चा सुरु असताना सहकारी शिवसैनिकांसोबत त्या उत्स्फूर्त घोषणा देत चालत होत्या. मात्र अचानक चालताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं.

*रूग्णालयात निधन*
दुर्गा भोसले-शिंदे यांना त्रास जाणवू लागल्याने वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना रूग्णालयात नेले. नंतर उपचारासाठी तातडीने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल केलं होतं. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी समोर आली. रात्रौ दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत हृदयविकाराच्या तीव्र ‘धक्क्याने मालवली.

*मोठा धक्का*
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले – शिंदे यांची ओळख होती.
युवा सेनेच्या राज्यभरात संघटनात्मक य बांधणीत त्यांचा मोठा हातभार होता. य त्यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

*आदित्य ठाकरेंना शोक अनावर*
युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे निधन झाल्याचं समजल्यानंतर युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. ‘दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झालंय. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ‘ओम शांती’ अशा आशयाचं ट्रीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

*खा. राऊतांची प्रतिक्रिया*
दुर्गा भोसले यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना खा. संजय राऊत म्हणाले, ‘दुर्गा भोसले या युवासेनेच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. जिथे जिथे अन्याय आहे, तिथे तिथे त्या जात असत. तरुण पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी. मृत्यू झाला.. आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करणारी घटना आहे. ती वकील होती. वाचन चांगलं होतं. निरीक्षण उत्तम होतं. अनेकदा फोनवर किंवा भेटीत तिच्या वागण्या- बोलण्यातून ती छाप पाडायची. आम्ही सगळेच तिच्या निधनानंतर दुःखात आहोत, अशा शब्दात राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

*मुंबईत अंत्यसंस्कार*
दरम्यान, दुर्गा भोसले या दि ग्रेट मराठा लिडर म्हणून परिचित असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र केशवराव भोसले यांच्या कन्या होत. गुरूवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मुंबईतील पेडर रोडवरील जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या कंबाला हिल या निवासस्थानी आणण्यात आले. तेथे अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. खेड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भोसले कुटुंबियांचे अनेक नातेवाईक आणि हितचिंतकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह अनेकांना शोक अनावर झाला.

RELATED ARTICLES

Most Popular