31.9 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

आरेतील ५० गुंठ्यांवर कांदळवन रोपवन

किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजीविकेसाठी...

इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचे पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणीव...
HomeRatnagiriरत्नागिरी कृ. उ. बा. समितीसाठी ४६ अर्ज दाखल

रत्नागिरी कृ. उ. बा. समितीसाठी ४६ अर्ज दाखल

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर १७ जागांसाठी ४६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.दरम्यान ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या माध्यमातून तशा हालचाली सुरू आहेत.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वपक्षीय सहकार पॅनल स्थापन झाले आहे. सध्याच्या संचालक मंडळामध्ये शिवसेना (ठाकरे गट) ५, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस ५ आणि भाजपा २ असे संचालक आहेत. दरम्यान शिवसेनेत २ गट पडल्याने सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या माध्यमातून कसा तोडगा काढला जातो आणि कसे जागावाटप होते याविषयी उत्सुकता आहे.

मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत. २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत सहकार पॅनलच्या माध्यमातून शिवसेनेच्या दोन्ही गटांसह भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना उचित जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुमारे ४५० मतदार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया अतिशय किचकट स्वरूपाची असल्याने निवडणूक बिनविरोध व्हावी असा स्वर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते लावताना दिसत आहेत. आर्थिकबाबीचा विचार करता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही फारसे राहिलेले नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बिनविरोध निवडणूक व्हावी असे सर्वच पक्षांना वाटते. दरम्यान, सर्वपक्षीय सहकार पॅनलची येत्या दोन-चार दिवसात बैठक होणार असून त्यावेळी अंतिम निर्णय होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले. या निवडणुकीची जबाबदारी बाबाजी जाधव आणि संचालक गजानन पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले. दरम्यान, बिनविरोध निवडणूक व्हावी असा सर्वांचाच कल असला तरी त्यासाठी नेमका पुढाकार कोण घेणार? असा प्रश्न असल्याचे कळते.

RELATED ARTICLES

Most Popular