25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजि.प. नवीन प्रशासकीय इमारतीचा आराखडा सादर

जि.प. नवीन प्रशासकीय इमारतीचा आराखडा सादर

वीन प्रशासकीय इमारत सध्या असलेल्या जि.प.च्या प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील भागात उभारण्यात येणार आहे. इमारतीला एक प्रकारे कॉर्पोरेट लूक दिला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला चालना देताना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इमारत बांधकाम आराखडा सादरीकरण करण्यात आला. बेसमेंट, तळमजला, अधिक सहा मजली संपूर्ण कॉर्पोरेट लूक असणारी ही प्रशासकीय इमारत नजिकच्या काळात उभारली जाणार असून लवकरच या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारतीबद्दल विस्तारित सांगण्यात आले. बेसमेंट, तळमजला अधिक सहा मजली अशी ही इमारत असेल. चारचाकी तसेच दुचाकीसाठी पार्किंग सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. पहिल्या मजल्यावर विविध विभागांची कार्यालये असतील. दुसरा, तिसरा तसेच चौथ्या मजल्यावर दोन सभापती दालनासह इतर विभागांची कार्यालये राहतील, पाचवा मजला हा व्हीआयपी मजला असेल.

सहावा मजला हा सभागृहासाठी ठेवण्यात आला आहे. याठिकाणी फक्त सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यानाच जाण्यास अनुमती असेल. याठिकाणी समिती सभागृह, सर्वसाधारण सभेसाठीची वेगवेगळी सभागृहे असतील. २०० सिट्सची या सभागृहाची बैठक व्यवस्था असणार आहे. सभागृहाला लागूनच पॅन्ट्रीची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. याच मजल्यावर सांस्कृतिक सभागृहही राहणार आहे.

हि नवीन प्रशासकीय इमारत सध्या असलेल्या जि.प.च्या प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील भागात उभारण्यात येणार आहे. इमारतीला एक प्रकारे कॉर्पोरेट लूक दिला जाणार आहे. इमारतीमध्ये व्हीआयपींसाठी कॅप्सूल लिफ्टची व्यवस्था असेल. तर इतरांसाठी अन्य दोन लीफ्टची व्यवस्था राहणार आहे. इमारतीला म्युरल आर्टने सुशोभिकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. संपूर्ण परिसरामध्ये विविध प्रकारच्या सुंदर झाडांची लागवड करून परिसर सुशोभित केला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular