22.2 C
Ratnagiri
Saturday, January 24, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunचिपळूण मटण-मच्छीमार्केट लिलावाला शून्य प्रतिसाद

चिपळूण मटण-मच्छीमार्केट लिलावाला शून्य प्रतिसाद

३० वर्षांसाठी येथील ४३ गाळे भाड्याने देण्यात येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेली मटण व मच्छीमार्केटच्या इमारतीसाठी नूतनीकरणानंतर पालिका प्रशासनाने लिलाव प्रक्रिया राबवली; मात्र त्यास व्यावसायिकांनी शून्य प्रतिसाद दिला. या ई-लिलाव प्रक्रियेत एकाही व्यावसायिकाने सहभाग न घेतल्याने पालिका प्रशासनासमोर फेरलिलाव करण्याची वेळ आली आहे. चिपळूण पालिकेने मच्छी-मटणमार्केट इमारतीची तात्पुरती डागडुजी करून गाळ्यांचा लिलाव जाहीर केला होता. ३० वर्षांसाठी येथील ४३ गाळे भाड्याने देण्यात येणार आहेत. मटण मार्केटची इमारत २००९ मध्ये उभारण्यात आली; मात्र, बांधकाम झाल्यापासून अनेक गाळे वापरात आलेच नाहीत. २०२० मध्ये या इमारतीचे मूल्यांकन करून आवश्यक नूतनीकरण व सुविधा उपलब्ध करण्यासाठी ६२ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आवश्यक दुरूस्ती करत पालिकेने येथील ४३ गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली.

रस्ता सन्मुख असलेले १ ते १५ गाळ्यांपैकी अनुसूचित जाती-जमातीपैकी व भटक्या विमुक्त जाती-जमातीकरिता आणि दिव्यांग व्यक्तीकरिता प्रत्येकी १ असे २ गाळे आरक्षित ठेवले आहे. या गाळ्यांचे क्षेत्रफळ १४. ६२५ चौ. मी. असून, नापरतावा अनामत रक्कम २ लाख ७१ हजार ८९ रुपये भरावी लागणार आहे तर गाळ्यांचे मासिक भाडे ३६५० रुपये ठेवले आहे. मच्छीमार्केटच्या १ ते १० गाळ्यांमधील पहिला गाळा दिव्यांगासाठी आरक्षित ठेवला आहे. या गाळ्यांसाठी ना परतावा अनामत रक्कम २ लाख १७ हजार ५२३ रुपये आहे तर १ ते १८ मटणमार्केट गाळ्यांमधील १ गाळा आरक्षित आहे. या गाळ्यांसाठीदेखील मच्छी मार्केटप्रमाणेच अनामत रक्कम भरावी लागणार आहे. मटण व मच्छीमार्केटच्या गाळ्यांचे मासिक भाडे २९०० रुपये ठेवण्यात आले आहे. एकूण ३० वर्षांसाठी हे गाळे ई-लिलाव प्रक्रियेतून भाड्याने देण्यात येणार आहे; मात्र याच दरम्यान मुकादम यांनी जाहिरात प्रसिद्ध करत व्यावसायिकांनी या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ नये, असे आवाहन केले होते. या लिलावाकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली.

RELATED ARTICLES

Most Popular