26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriओवीबद्ध गीतेचे इंग्रजी भाषांतर पुढील पिढ्यांना ठरणार उपयुक्त

ओवीबद्ध गीतेचे इंग्रजी भाषांतर पुढील पिढ्यांना ठरणार उपयुक्त

रत्नागिरीतील पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी हे काव्यरूप इंग्रजी भाषांतर केले आहे. हे पुस्तक 'ई-बुक' स्वरूपातही उपलब्ध आहे.

झोपाळ्यावरची गीता या मराठी ओवीरूप पुस्तकाच्या राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतराचे गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीत प्रकाशन झाले. त्या वेळी चितळे यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, अणुबॉम्बचा पहिला प्रायोगिक स्फोट होताच निर्माण झालेला प्रचंड प्रकाश पाहून प्रमुख संशोधक ओपनहायमर यांनी ”सहस्रसूर्याचे तेज” या अर्थाचा भगवद्गीतेमधील श्लोक म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परदेशी विद्वान अर्थासह गीता पाठ करत असता आपल्याकडे मात्र जे आमचे आहे ते अभिमानाने मिळवावे असे आपल्याला वाटत नाही, हे दुर्दैव आहे. असे श्री. चितळे म्हणाले.

पाश्चात्य विद्वानांनी भगवद्गीतेचा सखोल अभ्यास केला. आपण मात्र आपल्याच देशात जन्मलेल्या या उत्तुंग तत्त्वज्ञानाकडे पाठ फिरवू लागलो आहोत. माणसाच्या जीवनात आजही गीता मार्गदर्शक ठरणारी आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष, प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

१०५ वर्षांपूर्वी दत्तात्रय अनंत आपटे यांनी ”अनंततनय” या नावाने लिहिलेले ”झोपाळ्यावरची गीता” हे ओवीबद्ध मराठी पुस्तक ”द गीता इन लेझर” या नावाने रत्नागिरीतील ”सत्त्वश्री प्रकाशना”ने इंग्रजीत आणले आहे. रत्नागिरीतील पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी हे काव्यरूप इंग्रजी भाषांतर केले आहे. हे पुस्तक ‘ई-बुक’ स्वरूपातही उपलब्ध आहे. या वेळी डॉ. प्रणव प्रभू, पत्रकार प्रमोद कोनकर, अनिकेत कोनकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular