27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriआंबा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

आंबा घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

काही काळ वाहतूक एक दिशा मार्गाने सुरू होती

वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे काजळी नदी धोका पातळी ओलांडून वाहत होती. त्यामुळे किनारी भागात पुराचे पाणी शिरले. लांजा मठ येथील दत्त मंदिर तर चांदेराई येथील बाजारेपठेत पाणी शिरले होते. सुमारे चार तासानंतर पुराचे पाणी ओसरले. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक एक दिशा मार्गाने सुरू होती. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी १०१.१४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये मंडणगड ७५.६०, दापोली ८७.४०, खेड ८०.१०, गुहागर ८६.२०, चिपळूण ८२.२०, संगमेश्वर १३१.४०, रत्नागिरी १४८.७०, लांजा ११९.००, राजापूर ९९ मिमी नोंद झाली.

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे लावणीच्या कामांना वेग आला आहे. काल रात्री मुसधार पावसाने रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या तीन तालुक्यांना झोडपले. शास्त्री, गडनदी दुथडी भरून वाहत होती. पावसाचा जोर आंबा घाटातही सुरू राहिल्यामुळे काजळी नदीला पूर आला. पुराचे पाणी किनारी भागातील भात शेतीमध्ये शिरले होते. मठ येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले होते. पुढे चांदेराई बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी भरण्यास सुरवात झाली. दीड ते दोन फूट पाणी होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरही ओसरला. पुराच्या भीतीमुळे बाजारातील दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरवात केली.

पहाटेच्या सुमारास व्यावसायीकांची तारांबळ उडाली. पुराचे पाणी चार ते पाच तास होते. दुपारी पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर पूर ओसरला. त्यामुळे व्यावसायिकांनी निःश्वास सोडला. पावसामुळे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंबा घाटात कलकदरानजीक दरड कोसळली आहे. घाट परिसरात कालपासून पडत असलेल्या अती पावसामुळे डोंगरातील माती भुसभुशीत झाल्याने दरड कोसळली. ही घटना घडली तेव्हा काहीवेळात एक ट्रक पुढे निघून गेला होता. त्यानंतर काही वेळातच ही दरड कोसळली. हा प्रकार घडल्यानंतर काही काळ वाहतूक एक दिशेने सुरू ठेवण्यात आली होती.

RELATED ARTICLES

Most Popular