24.1 C
Ratnagiri
Wednesday, November 12, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunप्लास्टिक मुक्तीसाठी, चिपळूणात कापडी पिशव्यांचे वेंडिंग मशीन

प्लास्टिक मुक्तीसाठी, चिपळूणात कापडी पिशव्यांचे वेंडिंग मशीन

सह्याद्री निसर्गमित्र आणि नगर पालिकेच्या सहकार्यातून भाजी मंडई शेजारी कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे.

चिपळूण शहर आणि परिसरामध्ये  प्लास्टिक आणि रस्त्यावर टाकणाऱ्या कचर्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. त्यामुळे प्लास्टिक आणि कचरामुक्तीसाठी चळवळ आता जोर धरू लागली आहे. समाजातील विविध घटकांतून यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे यासाठी प्लास्टिक संकलन, स्वच्छतामोहीमसारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.

बाजारपेठ आणि शहरातून रोज मोठ्या प्रमाणात प्लास्टिक संकलन केले जात आहे. या सर्व प्लास्टिकचे वर्गीकरण करून ते रिसायकलिंगसाठी पाठवण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेऊन व्यापार्यांनी आणि नागरिकांनी कचरामुक्त चिपळूणसाठी पुढे यावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून वेंडिंग मशीनमधील कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगर पालिकेतर्फे करण्यात आले. या वेळी नगर पालिकेचे कर्मचारी, सह्याद्री निसर्गमित्रचे कार्यकर्ते आणि व्यापारी उपस्थित होते.

सह्याद्री निसर्गमित्र आणि नगर पालिकेच्या सहकार्यातून भाजी मंडई शेजारी कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसवण्यात आली आहे. या मशिनमधून ५ रुपयाला कापडी पिशवी मिळणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा नियमित वापर करावा, या एकमेव हेतूने ही सुविधा उभारण्यात आली आहे.

प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत चिपळूणकर जागरूक आहेत; मात्र प्लास्टिक पिशव्यांना पर्याय मिळाल्याशिवाय त्यांचा वापर थांबणे शक्य नाही. यासाठी रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध मिळवून देणारे मशीन बाजारपेठेत बसवण्यात आले आहे. केवळ पाच रुपये इतक्या अल्प किमतीत चिपळूणकरांना कापडी पिशव्या मिळणार आहेत. या मशीनमुळे बाजारपेठेत सर्रास वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular