26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedमुंबई -गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील वळणाचा प्रश्न मार्गी

मुंबई -गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील वळणाचा प्रश्न मार्गी

राष्ट्रीय महामार्ग खात्याचे महाड येथील उपअभियंता पंकज गोसावी व शाखा अभियंता अमोल मडकर, कन्सल्टंट विजय दुर्गे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घाटातील वळण कमी करण्यासाठी आणखी दोन लेन वाढवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई -गोवा महामार्गावर असलेल्या भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने अपघात होत आहेत. हे अपघात थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने तातडीने भोस्ते घाटाच्या वाढीव कामाचे ३२ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. याची माहिती उपअभियंता व शाखा अभियंता यांनी शौकत मुकादम यांना दिली. भोस्ते घाटातील अवघड वळणावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथे उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला होता. त्यानंतर महामार्ग विभागाने तातडीने कार्यवाही केली आहे. महामार्गावरील भोस्ते घाटात सध्या दोन लेन आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर सध्या मोठमोठे गतिरोधक उभारण्यात आले आहेत.

बाजूला संरक्षण भिंत असून त्यावर टायर लावण्यात आले आहेत. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले असून, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हे अवघड वळण कमी करावे, अशी मागणी मुकादम यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे महाड येथील उपअभियंता पंकज गोसावी व शाखा अभियंता अमोल मडकर, कन्सल्टंट विजय दुर्गे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घाटातील वळण कमी करण्यासाठी आणखी दोन लेन वाढवण्याचा निर्णय घेतला. या दोन लेन करताना वळणातील उतार कमी होईल, अशी रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे जाणाऱ्या वाहनांची गैरसोय टळेल व अपघातावर नियंत्रण येईल. घाटात जाणाऱ्या दोन व येणाऱ्या दोन अशा चार लेन तयार होतील. त्यामुळे वाहनचालकांना अधिक दिलासा मिळेल. हे डिझाईन तयार करून ते दिल्लीला केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य पातळीवरील सर्व प्रशासकीय मान्यता व इतर मंजुऱ्या घेऊन तयारी करण्यात येणार आहे. सोमवारी सायंकाळी पावसात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम व उपअभियंता पंकज गोसावी, शाखा अभियंता अमोल मडकर, कन्सल्टंट विजय दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते वसिम मुकादम, दशरथ जाधव, सुभाष कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी उपअभियंता गोसावी यांनी मुकादम यांना अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवले असून अन्य बाबींची पूर्तता करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular