हल्ली सगळीकडे लाच घेणे आणि देणे या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. बाल लैंगिक अत्याचारासबंधी तपासासाठी सिंधुदुर्गहून आलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अकडल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये २ लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडत बेड्या ठोकल्या आहेत. अनेक ठिकाणी मागील काही महिन्यांपासून सोनोग्राफी सेंटरची देखील तपासणी सुरु आहेत. शासनाच्या नियमावली प्रमाणे सर्व सेन्टर्स सुरु आहेत कि त्यामध्ये काही बदल करणे आवश्यक आहे याची खातरजमा केली जात आहे.
एसीबीने सिंधुदुर्ग येथील महिला पोलीस अधिकाऱ्याला महिला डॉक्टरकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. नलीनी शंकर शिंदे असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी नलीनी यांनी पाच लाखांची मागणी केली होती. ही कारवाई निगडी परिसरात करण्यात आली आहे. सध्या अनेक सोनोग्राफी सेंटर
एका जेष्ठ महिला डॉक्टरने पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. सिंधुदुर्गच्या महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं नलिनी शंकर शिंदे असं नाव आहे. नलिनी या मालवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याच्या तपासासाठी निगडीत आल्या होत्या. त्यांनी महिला डॉक्टरकडे सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करते असे सांगून ५ लाखांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २ लाख घ्यायचे ठरले, ते पैसे घेताना एसीबीने पोलीस अधिकारी नलिनी यांना रंगेहाथ पकडले आहे.