27.7 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeIndiaसिलेंडरच्या दरामध्ये कपात, जनतेला दिलासा

सिलेंडरच्या दरामध्ये कपात, जनतेला दिलासा

नवीन किंमती १ जुलै म्हणजेच आजपासून लागू करण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्य जनतेसाठी जुलै महिन्याची सुरूवात चांगली झाली आहे. केंद्र सरकारने एलपीजीच्या गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये कपात केली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये १९८ रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती १ जुलै म्हणजेच आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइल ऑइलचा १९ किलोग्रॅमचा कमर्शिअल गॅस सिलिंडर आता २०२१ रुपयांना मिळणार आहे. याआधी १ जून रोजी किंमतींमध्ये १३५ रुपये कमी करण्यात आले होते. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.

१९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर आजपासून म्हणजेच १ जुलैपासून २०० रुपयांनी स्वस्त झाला आहे. विविध राज्यात या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती जाणून घेऊया. दिल्लीत आता १९ किलोचा सिलेंडर २२१९ ऐवजी २०२१ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये २३२२ रुपयांऐवजी २१४० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत २१७१.५० रुपयां ऐवजी १९८१ रुपयांना मिळणार आहे.

चेन्नईमध्ये १९ किलोचा सिलेंडर २३७३ रुपयांऐवजी २१८१ रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी दिलेल्या या सवलतीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल. यापूर्वी १ जून रोजी १९ किलोच्या सिलेंडरच्या किमतीत १३५ रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर दोनदा वाढवण्यात आले होते.

७ मे रोजी घरगुती सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले होते. त्याच वेळी, १९ मे रोजी ३.५० रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, सध्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. १ जूनपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु, काही दिवसांपूर्वीच जनतेला मोठा दिलासा देत सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर २०० रुपये गॅस सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला १२ सिलिंडरवर मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular