26.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriशेतकरी आक्रमक माकडांच्या बंदोबस्तासाठी उपोषणाचा इशारा

शेतकरी आक्रमक माकडांच्या बंदोबस्तासाठी उपोषणाचा इशारा

नुकसानभरपाई हा इलाज नाही. वानरांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आम्ही नुकसानभरपाई मिळण्याकरिता शेती करत नाही.

गेल्या ३० वर्षांत वानर, माकडांची संख्या १०० पटीने वाढली आहे. शेती, बागायतीचे उत्पन्नच मिळाले नाही तर कोकणात शेतकरी जगू शकत नाही. या वेळी वानर, माकडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, असा एकमुखी ठराव आज शेतकऱ्यांच्या बैठकीत केला. या संबंधीचा ठराव १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत करून ते शासनाकडे पाठवण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला, तसेच पावसाळी अधिवेशनात यावर तोडगा काढा अन्यथा महिन्याभरात साखळी उपोषण करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. कायद्याचे भय दाखवू नका.

कायदा जनतेसाठीच आहे. त्यामुळे सुरक्षित व भयमुक्त शेतीचा आमचा अधिकार आहे तो मिळावा याकरिता शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार आजच्या सभेत केला. वानरांचा बंदोबस्त करा अन्यथा महिन्याभरात उपोषणाला बसू, असे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व वन विभागाला सर्व शेतकऱ्यांनी वैयक्तिक नेऊन दिली.  गोळप येथील अविनाश काळे यांनी गतवर्षी वानर, माकडांच्या बंदोबस्तासाठी उपोषण केले. त्यानंतर माकडांचा प्रश्न विधानसभेत पोहोचला. त्यावर समितीही गठित झाली; मात्र निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला २०० हून अधिक बागायतदार उपस्थित होते.

या वेळी काळे म्हणाले, ‘पूर्वी वानरांची शेपटी दाखवा ५ रुपये मिळवा अशी योजना होती; परंतु नंतर कायदे आले व वानरांना संरक्षण मिळाले, परंतु ३० वर्षांत वानरांची संख्या १०० पटीने वाढली आहे. कोणतीही शेती करण्यास शेतकरी घाबरतात, ही गोष्ट शासनाला कळत नाही. आमच्याकडे तक्रारी येत नाहीत, असे शासनाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे प्रत्येक गावातून समस्यांची निवेदने पाठवली पाहिजेत. शेती करता येत नसल्याने उत्पन्न मिळत नाही, ही शासनाचीच जबाबदारी आहे.

नुकसानभरपाई हा इलाज नाही. वानरांचा बंदोबस्त झाला पाहिजे. आम्ही नुकसानभरपाई मिळण्याकरिता शेती करत नाही. समितीच्या अहवालात माकडांची नसबंदी तसेच माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्याच्या शिफारशी आहेत; परंतु याचा काहीही उपयोग नाही. या प्रसंगी प्रवीण जोशी यांनी शेतकरी संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच सचिन काळे, दिलीपकुमार साळवी, विनायक ठाकूर, दशरथ रांगणकर, सुधीर तेंडुलकर, रवींद्र भोवड यांनी मनोगत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Most Popular