27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriकरबुडे गावाचा संपूर्ण विकास करणार - पालकमंत्री उदय सामंत

करबुडे गावाचा संपूर्ण विकास करणार – पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री सामंत म्हणाले, 'करबुडे गावच्या विकासासाठी मागाल ती कामे मंजूर केली जातील. एकही काम मागे ठेवणार नाही.

तालुक्यातील करबुडे गावच्या विकासकामासाठी जराही निधी कमी पडू देणार नाही. महिनाभरात आणखी एक कोटीचा निधी जिल्हा नियोजनमधून दिला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. करबुडे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आले. पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘करबुडे गावच्या विकासासाठी मागाल ती कामे मंजूर केली जातील. एकही काम मागे ठेवणार नाही.

आपण विकासाचा आराखडा तयार करा. महिनाभरात आणखी १ कोटीचा निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले. सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी सर्वांचे आभार मानले. गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबू म्हाप, प्रवीण पांचाळ, शंकर सोनवणकर, मिलिंद खानविलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular