27.9 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriरत्नागिरीत झाडगाव एमआयडीसीत अपॉइंटमेंटच्या नावाखाली १ लाख ८९ हजारांची फसवणूक

रत्नागिरीत झाडगाव एमआयडीसीत अपॉइंटमेंटच्या नावाखाली १ लाख ८९ हजारांची फसवणूक

ऑनलाईन फसवणुकीचे फंडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. अज्ञातांकडून विविध प्रकारच्या शक्कल लढवण्यात येत आहेत. शहरातील झाडगाव एमआयडीसी येथील एकाने मुंबईतील हॉस्पिटलमधील डॉक्टरची अपॉइंटमेंट घेण्यासाठी बुकिंग अॅपचा उपयोग केला. युपीआय नंबर मिळवून अज्ञाताने चक्क १ लाख ८९ हजार ६ रुपये बँक अकाऊंटमधून आपल्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर करून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना २७ ते २९ मे रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास झाडगाव एमआयडीसी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादाराचा भाऊ अब्दुलशकूर कासम खान यांची बायोप्सी टेस्ट मुंबईतील प्रधान हॉस्पिटल येथे करायची होती. त्यासाठी तक्रारदाराने हॉस्पिटलची अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांच्या ओळखीचे शकील मजगावकर यांनी गुगलवरून सुलतान प्रधान हॉस्पिटल मुंबई यांचा मोबाईल नंबर दिला.

फिर्यादी यांचा भाऊ नौशाद याने अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल केला. अपॉइंटमेंटसाठी ५ रुपये ऑनलाईन पेमेंट करावे लागेल, असे सांगून त्याकरिता हॉस्पिटल ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग अॅपची लिंक पाठवली. ती ओपन करून त्यामध्ये पेशंटचे नाव व युपीआय नंबर टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांचा भाऊ नौशाद याने सांगितल्याप्रमाणे केले; मात्र नौशाद व अब्दुलशकूर कासम खान यांनी सुलतान प्रधान हॉस्पिटल येथे जाऊन अपॉइंटमेंटबाबत विचारपूस केली. तेथे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली नसल्याचे समजले. त्यानंतर नौशाद याने आपल्या कॅनरा बँकेचे स्टेटमेंट चेक केले. तर त्या वेळी अज्ञात मोबाईलधारकाने ऑनलाईन पद्धतीने फिर्यादी यांचा भाऊ नौशाद यांच्या अकाउंटमधून १ लाख ८९ हजार ६ रुपयांची रक्कम स्वतःच्या काउंटरला ट्रान्स्फर करून घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत; मात्र ऑनलाईन फसवणुकीचे फंडे वाढतच असून यासाठी वेळोवेळी पोलिस प्रशासनाकडून माहिती दिली जात आहे; मात्र अज्ञात मोबाईलधारकांकडून वेगवेगळ्या शक्कल वापरून ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular