27.8 C
Ratnagiri
Tuesday, July 23, 2024

… म्हणून सूर्यकुमार कर्णधार, अध्यक्ष आगकर यांनी जाहीर केली भूमिका

प्रत्येक सामन्यास उपलब्ध राहील, असा खेळाडू कर्णधार...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्टच आपला दावा खरा ठरलाः वैभव खेडेकर

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट होत...

रिक्त जागी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करा – संघटनेची मागणी

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांवर स्थानिक...
HomeRatnagiriरत्नागिरी नगरपालिकेचा दावा 'शीळ'मध्ये महिनाभर पुरेल एवढे पाणी…

रत्नागिरी नगरपालिकेचा दावा ‘शीळ’मध्ये महिनाभर पुरेल एवढे पाणी…

रत्नागिरी शहरवासीयांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाई अधिक गडद होऊ नये, यासाठी पालिकेने एप्रिलमध्ये नियोजन करून दिवासाआड पाणीपुरवठा सुरू केला. शीळ धरणात अजून ०.५३३ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हा साठा पुढील ३० दिवस पुरेल, असा पालिकेचा दावा आहे. शहरात आजही काही भागांत टंचाईची स्थिती आहे. दिवसाला टँकरच्या १० ते १२ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पालिकेनेही मागेल त्याला टँकर देण्यास दिला सुरुवात केली आहे. शीळ धरणात असलेला पाणीसाठा सध्याच्या परिस्थितीत पुरेसा असल्याचे पालिकाकडून सांगण्यात येत असले तरी झाडगाव, जोशी पाळंद, साळवी स्टॉप परिसरात पाणी नसल्याची नागरिकांकडून ओरड होत आहे. एप्रिलच्या अखेरीस शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. शहरातील अनेक पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी विहिरीदेखील आटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता दिसत आहे. शहराला सुमारे साडेदहा हजार नळजोडणीधारकांना दिवसाला १८ ते २० एमएलडी पाणी पुरवले जाते.

आता दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने एका दिवसाची बचत होते. शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठ्याची सवय आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी तो मुबलक केला जातो. मात्र, अनेक अपार्टमेंट किंवा काही भागांतून वारंवार पाण्याची मागणी होते. त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाण्याव्यतिरिक्त सुमारे ६० हजार ते लाख लिटर पाण्याचा जादा पुरवठा शहरात करावा लागत आहे. शहरातील वरच्या भागात सर्वांत जास्त पाण्याची मागणी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३७३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे; परंतु आजमितीला शीळ धरणात ०.५३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. दिवसाआड पाणी देत असल्याने पुढील ३० दिवस हे पाणी पुरेल एवढा हा साठा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular