25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeChiplunचिपळुणात स्वातंत्र्य दिनानिमित्त उबाठातर्फे १०० फूट तिरंगा रॅली

चिपळुणात स्वातंत्र्य दिनानिमित्त उबाठातर्फे १०० फूट तिरंगा रॅली

जिजाऊ ब्रिगेडने देखील हर घर तिरंगा उपक्रम राबवला होता.

स्वातंत्र्य दिनानिमित्त चिपळूणमध्ये सलग दोन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रम ांनी वातावरण निर्मिती सुरू असतानाच स्वातंत्र्य दिनी गुरुवारी सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शहरात १०० फूट तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी तसेच शालेय विद्यार्थी, युवक – युवती व सामान्य नागरिक मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. भव्य अशा या रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा होत असल्याने यावेळी सरकार कडून हर घर तिरंगा उपक्रम संपूर्ण देशभर राबवण्याची घोषणा करण्यात आली.

सरकारच्या या घोषणेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. घर, वाहने, कार्यालये, दुकान, हॉटेल आशा सर्वच ठिकाणी तिरंगा दिसून येत होता. त्यामुळे स्वातंत्र्य दिनापूर्वीच मोठ्या प्रमाणात वातावरणात निर्मिती झाली होती. बुधवारी चिपळूण नगरपालिकेने बाईक तिरंगा रॅली काढली, तसेच गीत गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. जिजाऊ ब्रिगेडने देखील हर घर तिरंगा उपक्रम राबवला होता. चिपळूण शहर उद्धव ठाकरे पक्षाने गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात १०० फुटी तिरंगा रॅलीचे आयोजन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

सकाळी चिपळूण नगरपालिके समोरून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, सहसंपर्क प्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख शशिकांत मोदी, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, यांच्यासह सर्व आजमाजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच शालेय विद्यार्थी, तरुण, तरुणी, महिला पदाधिकारी व नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. १०० फुटी तिरंगा रॅली बाजारपेठ होऊन चिंचनाका मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते पुन्हा नगरपालिके समोर येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. दुपारपर्यंत ही रॅली सुरू होती. शहरात प्रथमच आशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आल्याने त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि ही रॅली लक्षवेधी ठरली होती.

RELATED ARTICLES

Most Popular