25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeRatnagiriजिल्ह्यातील रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा आधार

जिल्ह्यातील रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा आधार

रत्नागिरी जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका १०८ च्या उपलब्ध असून, अजून ७ रुग्णवाहिकांची जिल्ह्याला गरज आहे.

अपघात, शारीरिक दुखापत किंवा अन्य विविध कारणांमुळे वैद्यकीय सेवा हवी असल्यास ग्रामीण भागातून शासकीय रुग्णालयापर्यंत स्त्रणाला पोचवण्यासाठी शासनाची १०८ रुग्णवाहिका ‘लाईफलाईन’ ठरत आहे. दुर्गम भागातील अनेक रुग्णांना या यंत्रणेचा लाभ मिळाल्यामुळे जीवनदान मिळाले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील २५ हजार रुग्णांना रुग्णवाहिकेमधून वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक तेथे नेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १७ रुग्णवाहिका १०८ च्या उपलब्ध असून, अजून ७ रुग्णवाहिकांची जिल्ह्याला गरज आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना, गाव व अपुऱ्या सुविधा पाहता उपलब्ध रुग्णवाहिका कमी पडतात. ग्रामीण वस्ती डोंगराळ भाग, रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट अशी आहे.

अरूंद आणि नागमोडी वळणांचे रस्ते यामुळे या यंत्रणेला जलदसेवा पुरवण्यात अडचणी आहेत. तरीही ही यंत्रणा अविरत सेवा देत आहे. २०२३ या वर्षात २५ हजार ९८ रुग्णांनी १०८ सेवेचा लाभ घेतला आहे. मागील तीन वर्षांत एकूण ९६ हजार ७४६ रुणांना विविध घटनांमध्ये सेवा पुरवून त्रणांचे प्राण वाचवले आहेत. या तीन वर्षांत १४६७ वाहन अपघात झालेत. हल्ल्याच्या १०३ घटनांमध्ये रुग्णसेवा दिली. जळलेल्यांमध्ये १४३ तर कार्डियाक ७५९, पडलेले ६०६, नशा, विषबाधा ११३९, प्रसूती, गर्भधारणा ४८०२, सामूहिक अपघात ६८, वैद्यकीय ६३ हजार २०९, इतर २२ हजार ४८६, पॉलीट्रामा १९४०, आत्महत्या २ अशा ९६ हजार ७४६ रुग्णांचे प्राण वाचवायचे काम १०८ ने केले आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीतील ४८९ गर्भवती महिलांची प्रसूती ही १०८ मध्येच झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular