28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriजिल्ह्यात फळबाग लागवडीवर १२ कोटींचा खर्च - 'मनरेगा' योजना

जिल्ह्यात फळबाग लागवडीवर १२ कोटींचा खर्च – ‘मनरेगा’ योजना

सर्वसामान्य नागरिक मनरेगा योजनेतील फळबाग लागवडी योजनेचा लाभ घेत आहे. 

कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या सहा वर्षांत राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी सुमारे १२ कोटींपेक्षा जास्त निधी खर्ची पडला आहे. यंदा ही योजना प्राधान्याने राबवण्यात येणार असून, योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे योजनेच्या उद्दिष्टात वाढ करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत टाळेबंदीमुळे मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतल्यामुळे त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात फळलागवडीला चालना मिळाली होती. आंबा, काजू या हमखास उत्पन्न देणाऱ्या फळबागांकडील कल दिवसेंदिवस वाढत आहे. आंब्यापेक्षा काजू लागवडीवर अधिक भर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मनरेगा योजनेतील फळबाग लागवडी योजनेचा लाभ घेत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्या माध्यमतानू शेतीपूरक रोजगारही मिळाला आहे. शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा होत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात योजनेतील लागवडीचे प्रस्ताव प्रगतिपथावर आहेत. मजुरीसाठी या योजनेत अडीच कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. गेल्या सहा वर्षात तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील २ हजार २८५.७५ हेक्टर क्षेत्रात आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी ३ हजार ५२८ मजुरांना ११ कोटी ८४ लाख १ हजार ८७९ रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला आहे. भविष्यात या योजनेंतर्गत वाढ होत राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular