27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriरत्नागिरीतील तिघा भोंदूंवर गुन्हा ; वृद्धाला ८५ लाखांचा गंडा

रत्नागिरीतील तिघा भोंदूंवर गुन्हा ; वृद्धाला ८५ लाखांचा गंडा

रत्नागिरीतील भोंदू बाबासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

काळ्या जादूचा वापर करून करणी काढण्याची बतावणी करून गंगावेश येथील वृद्धाला ८४ लाख ६९ हजारांना गंडा घातल्याप्रकरणी रत्नागिरीतील भोंदू बाबासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान कणकवली, गंगावेश अशा ठिकाणी पूजा मांडून पैसे उकळले. याबाबत सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७, रा. दत्त गल्ली, गंगावेश) यांनी फिर्याद दाखल केली. याप्रकरणी भोंदू बाबा दादा पाटील महाराज (पाटणकर), आण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील ऊर्फ धनश्री काळभोर (सर्व रत्नागिरी), श्री. गोळे (रा. बारामती), कुंडलिक झगडे (रा. जेजुरी), तृप्ती मुळीक (कणकवली), ओंकार, भरत, हरिष (पूर्ण नावे व पत्ता समजू शकलेला नाही) यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

फिर्यादी सुभाष कुलकर्णी मूळचे नणंद्रे (ता. पन्हाळा) येथील. सध्या ते गंगावेश परिसरात राहतात. गावाकडील जमिनीबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे. तसेच इतर काही कौटुंबिक अडचणीमुळे ते चिंतेत होते. त्याच्याच मावसभावाने यातून सुटण्यासाठी बारामतीच्या गोळे नावाच्या व्यक्तीला भेटण्याची गळ घातली. १३ फेब्रुवारी २०२३ ला गोळे कुंडलिक झगडे नावाच्या साथीदाराला घेऊन कुलकर्णी यांच्या घरी आला. तुमचे न्यायालयीन वाद, मुलाच्या लग्नाची समस्या दूर करण्यासाठी पाटील महाराज यांना भेटूया, ते निराकरण करतील, असे सांगत कुलकर्णी यांचा विश्वास संपादन केला.

काळी जादू केल्याची बतावणी – फेब्रुवारी २०२३ मध्ये संशयित पाटील महाराज व त्याचे पाच साथीदार कुलकर्णी यांच्या घरात आले. नणंद्रे गावातील काही जणांनी तुमच्या घरच्यांवर करणी केल्याची बतावणी केली. कुलकर्णी यांना कणकवली येथे संशयित तृप्ती मुळीकच्या घरी नेले. फेब्रुवारीच्या अखेरीस पाटील यांच्या घरी पूजा मांडून रोख ११ हजार रुपये घेतले. पूजा सात दिवस करायची असल्याचे सांगून ७ हजार रुपये, शापीत बंध काढण्यासाठी ४० हजार रुपये घेतले.

सोने, चांदीच्या ऐवजावर डल्ला – घरातील अनेक वस्तूंवर काळी जादू केली असून, त्यांचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगून कुलकर्णी यांच्या घरातील साहित्य पितळी हांडे, जुनी भाडी, सागवानी कपाटे, जुने ग्रंथ, लाकडी खुर्चा असे साहित्य टेंपोत भरून नेले.

RELATED ARTICLES

Most Popular