25.6 C
Ratnagiri
Tuesday, September 17, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriशीळ धरणाच्या संरक्षक भिंतीसाठी १२ कोटी

शीळ धरणाच्या संरक्षक भिंतीसाठी १२ कोटी

रत्नागिरी शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारे आणि त्या पाण्यावर पालिकेचे १०० टक्के आरक्षण असलेले शीळ धरण आणखी सुरक्षित होणार आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण आणखी सुरक्षित आणि मजबूत होणार आहे. अतिवृष्टीमध्ये धरणाच्या सांडव्याच्या बाजूचा काही भाग खचला होता. त्यामुळे धरणाला काहीअंशी धोका निर्माण झाला. खचणाऱ्या डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंतीचा १४ कोटींचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने पाठवला होता. शासनाने त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले असून, लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागचे अधिकारी जी. एच. सलगर यांनी दिली. रत्नागिरी शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारे आणि त्या पाण्यावर पालिकेचे १०० टक्के आरक्षण असलेले शीळ धरण आणखी सुरक्षित होणार आहे.

शहरापासून साडेसहा किमी लांब असलेल्या शीळ धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शीळ नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी पालिकेने भाडेतत्त्वावर घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाखांचा पाण्याचा कर पालिका पाटबंधारे विभागाला भरते. विशेष म्हणजे या पाण्यावर १०० अधिकार पालिकेचा अधिकार असून, ते अन्य दुसऱ्या कोणत्याही वापरासाठी आरक्षित नाही. धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३१७ दशलक्ष घनमीटर आहे. शहराची लोकसंख्या लाखाच्या दरम्यान असून दिवसाला सुमारे २० एमएलडी पाणी त्यासाठी धरणातून उचलले जाते.

पानवल, नाचण्यातील तलाव सोडले तर पाणीपुरवठ्याचा सर्वांत जास्त भार शीळ धरणावर आहे. सांडव्यातून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतो; परंतु भविष्यात डोंगर खचून सांडव्यामध्ये मलबा आला तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या धरणाचे सर्व्हे करून धरण अधिक मजबूत कण्यासाठी डोंगराच्या बाजूनी संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने शासनाला सादर केला होता.

RELATED ARTICLES

Most Popular