29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurराजापुरातील 'जनआरोग्य'चा १२०९ जणांनी घेतला लाभ

राजापुरातील ‘जनआरोग्य’चा १२०९ जणांनी घेतला लाभ

सर्वसामान्य गरीब कुटुंबाला हा दिलासा ठरला आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा राजापूर तालुक्यातील १ हजार २०९ जणांनी लाभ घेतला आहे. यामधून औषधोपचारासह शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्वसामान्य गरीब कुटुंबाला हा दिलासा ठरला आहे. जनआरोग्य योजनेला राजापूर तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. यामध्ये ४० हजार १५७ पात्र लाभार्थ्यांनी आभाकार्ड काढली आहेत. त्यापैकी २६ हजार ७८५ कार्डाचे आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शासनाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आहे.

या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब, प्रतिवर्ष पाच लाखांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत आहेत. १ हजार २०९ आजारांच्या उपचारांकरिता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे आयुष्यमान कार्ड असणे गरजेचे आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून गावोगावी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे तर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यातून, ४० हजार १५७ लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढली आहेत. त्याचे वितरणही आरोग्य विभागातर्फे सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

असे काढा कार्ड – गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्मान अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करावे. त्यानंतर आधार फेस आरडी अॅप इन्स्टॉल करावे, आयुष्मान अॅपमध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्यायाची निवड करावी. मोबाईल ओटीपीद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर सर्च पर्यायांमध्ये नाव, आधारकार्ड क्रमांक आणि रेशनकार्ड ऑनलाईन आयडीद्वारे पात्र लाभार्थी शोधता येते. लाभार्थ्यांची ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथच्या माध्यमातून पूर्ण करता येते.

RELATED ARTICLES

Most Popular