27.5 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeRatnagiri१३ बांगलादेशी नागरिकांचे केले प्रत्यार्पण एजन्सीकडून कार्यवाही

१३ बांगलादेशी नागरिकांचे केले प्रत्यार्पण एजन्सीकडून कार्यवाही

बांगलादेशी नागरिकांना २० मे रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात आले.

नागरिकत्व नसताना रत्नागिरीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ दोषी बांगलादेशी आरोपींचे प्रत्यार्पण करण्याची कार्यवाही एजन्सीकडून पूर्ण केली. २० मे रोजी त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात रत्नागिरी पोलिस दलाला यश आले. रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ ला एक माहिती मिळाली होती की, पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये, भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत. त्याआधारे पोलिसांनी छापा टाकला. त्या कारवाईत १३ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले. वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली अशी त्यांची नावे आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने या सर्व १३ दोषी बांगलादेशी आरोपींना प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात आली. या सर्व बांगलादेशी नागरिकांना २० मे रोजी त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular