26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRajapurराजापुरात सेवाकेंद्रातून सव्वा वर्षात १३ हजार पासपोर्ट

राजापुरात सेवाकेंद्रातून सव्वा वर्षात १३ हजार पासपोर्ट

राजापूर पोस्ट कार्यालयात दररोज वेळेवर प्रस्तावांचा निपटारा केला जातो.

राजापूर येथील पोस्ट कार्यालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या पासपोर्ट (पारपत्र) सेवाकेंद्रातून गेल्या मागील सव्वा वर्षात १३ हजार १७६ पासपोर्ट देण्यात आले. या सुविधा केंद्रात नोंदणी केल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांत पासपोर्ट मिळतो. यामध्ये पोलिसांकडून तीन ते चार दिवसांत पडताळणी (व्हेरिफिकेशन) होत असल्यामुळे पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिकच सुलभ झाली आहे. परदेश प्रवासासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. पूर्वी पासपोर्टसाठी मुंबईला जावे लागत होते.

त्यानंतर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता; परंतु आता राजापूर येथील पोस्ट कार्यालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पासपोर्टसाठी पूर्वीसारख्या फेऱ्या न मारता ऑनलाइन अर्ज करावा लागतो तसेच कागदपत्र जमा करण्यासाठी मुलाखतीचा दिवस स्वतःच ठरवता येतो. त्यामुळे पासपोर्टची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. कागदपत्रांची पूर्तता वेळेवर केली असेल तर पोलिसांकडूनही व्हेरिफिकेशन अगदी चार दिवसांत होते.

त्यामुळे पासपोर्टही वेळेवर अगदी घरपोच पाठवला जातो. ऑनलाइन प्रक्रिया तसेच राजापूर पोस्ट कार्यालयात दररोज वेळेवर प्रस्तावांचा निपटारा केला जातो. दिवसाला ६० अर्जाची पडताळणी केली जाते तसेच २० प्रस्ताव पोलिस व्हेरिफिकेशनसाठी येतात. राजापूर येथील पासपोर्ट सेवाकेंद्रात एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ९ हजार ७२६ पासपोर्ट दिले गेले तर १ एप्रिल ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ३ हजार ४५० पासपोर्ट दिले गेले. नवीन पासपोर्ट नूतनीकरण, नावात बदल, लहान मुलांसाठी पासपोर्ट अशा सुविधा  दिल्या जातात.

RELATED ARTICLES

Most Popular