27.9 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeMaharashtraडोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

डोंबिवलीच्या भोपरमध्ये अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं..'

पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र बलात्काराच्या घटनेने हादरुन निघाली आहे. डोंबिवलीमध्ये एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ३० नराधम सामुहिक बलात्कार करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अल्पवयीन मुलीवर ३० जण वारंवार सामुहिक बलात्कार करत असल्याची भयंकर माहिती माहिती समोर आली आहे.

आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. त्यामुळे हेच राजकीय वजन लक्षात घेऊन, आरोपींनी अल्पवयीन पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता जनतेकडून उपस्थित केला जातो आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेतलं आहे.

लहान वयामध्ये प्रेमात पडणे, पीडीतेला चांगलच महागात पडलं आहे. आरोपींमध्ये तिच्या प्रियकराचा सुद्धा समावेश असून, त्याने जानेवारी महिन्यात या पीडित मुलीवर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ काढला. आणि या व्हिडीओवरून मुलीला सतत ब्लॅकमेल करत तिच्यावर ३०  जणांनी बलात्कार केला. मागील ८ महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते. डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सर्वांनी बलात्कार केल्याचं मुलीने सांगितलं. या प्रकरणी पोलिसांचा कसून तपास सुरू असून, अजून काही संशयित आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदर घटनेबाबत ट्विटरद्वारे तीव्र निषेध केला आहे. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीबरोबर घडलेली हि घटना अतिशय भयंकर आणि संतापजनक आहे. डोंबिवलीच्या भोपरमध्ये अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं..’

RELATED ARTICLES

Most Popular