29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...
HomeRatnagiriरस्त्याच्या डागडुजीसाठी १५ दिवसांची डेडलाईन - मिलिंद कीर

रस्त्याच्या डागडुजीसाठी १५ दिवसांची डेडलाईन – मिलिंद कीर

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील रस्ते दुरुस्ती करण्याची कामे पावसाळ्यापूर्वी करावयाची असूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर संपूर्ण शहरातील पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करून सहकार्य करावे अन्यथा येणाऱ्या १५ दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. “मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, माजी नगरसेवक बबन आंबेकर उपस्थित होते. शहरातील साळवीस्टॉप ते दांडा फिशरिज हा सलग एक रस्ता आहे. त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

हा रस्ता खोदून काँक्रिटीकरण करण्याचे पहिले अंदाजपत्र (एस्टिमेट) तयार केले. त्याला तांत्रिक मंजुरी (टेक्निकल सॅन्क्शन) घेतली; मात्र निविदा (टेंडर) करताना मूळ रस्त्यावर एक डांबराचा थर टाकण्यात आला आहे. या कामामुळे जुन्या अपार्टमेंटकडे जाण्या-येण्याचा मार्ग वर-खाली झाला असून, व्यापारांना व नागरिकांना त्याची झळ पोहचत आहे. ऐन पावसाळ्यात डांबरीकरण झाल्यामुळे नाईक महिंद्रा शोरूम, माळनाका दरम्यानचा रस्त्यावर खड्डे पडून खराब झाले आहेत. मारुती मंदिर सर्कल दरवर्षीप्रमाणे खराब झाला आहे. आठवडा बाजारच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. केतन मंगल कार्यालयाच्या अलीकडे खड्डे पडले आहेत.

रहाटाघर एसटी स्टॅण्डच्या इथे खड्डे पडले आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्ते खराब होऊन खड्ड्यांचे साम्राज्य आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल रत्नागिरी नगरपालिका घेत नाही. हा मनमानी कारभार आहे. त्याला कुणाचा तरी पाठिंबा आहे त्याचबरोबर रत्नागिरी शहराला नळपाणी योजनेनुसार प्रत्येक नागरिकाला १३५ लिटर पाणी प्रतिदिनी देण्याची पालिकेची योजना होती. भुयारी गटार योजनेला मान्यताही मिळाली आहे; मात्र भुयारी गटाराचे काम प्राधान्याने घेणे आवश्यक होते, तरीही रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular