24.6 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriबोटॅनिकल गार्डनमध्ये १५५ दुर्मीळ फुलझाडे, कोकण आयुक्तांकडून दखल

बोटॅनिकल गार्डनमध्ये १५५ दुर्मीळ फुलझाडे, कोकण आयुक्तांकडून दखल

कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी देवराईच्या उभारणीचे कौतुक केले.

जिल्हा दौऱ्यावर आलेले कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी व नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी तालुक्यातील कळबंस्ते येथे उभारलेल्या देवराईची पाहणी करत तेथे वृक्षारोपण केले. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी लिगाडे यांनी पुढाकार घेत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता लोकसहभागातून पडीक शासकीय जागेत देवराई उभारली आहे. या देवराईत महसूल, कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून श्रमदान केले जात आहे.

कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी देवराईच्या उभारणीचे कौतुक केले. दुर्मीळ होणाऱ्या १५५ प्रकारच्या फुलांचे येथे बोटॅनिकल गार्डन विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता फलदायी ठरणार आहे. येथील फुलांची व विविध जातींच्या रोपांची माहिती मिळण्यासाठी झाडांना क्युआरकोड लावण्यात येणार आहेत. कोकणातील देवरायांचे कालानुरूप अस्तित्व कमी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी व दुर्मीळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवरायांचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याकरिता सर्व पर्यावरण व निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन कळंबस्ते येथे साडेतीन एकर जागेत देवराईची संकल्पना हाती घेण्यात आली.

नागरिकांसाठी चार महिन्यांतच गार्डन खुले – प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर नाम फाउंडेशन, वनविभाग, काही कंपन्यांच्या सीएसआर फंडातून देवराई उभी करण्यासाठी पुढे आल्या. येथे एकाच दिवशी १९ विविध प्रजातींची १ हजार २५२ झाडे लावली आहेत. पाण्यासाठी ठिंबक सिंचनची व्यवस्था केली आहे. झाडांना नियमित पाणी मिळण्यासाठी बोअरवेलचीही व्यवस्था आहे. फुलांचे बोटॅनिकल गार्डन येत्या तीन-चार महिन्यांत नागरिकांसाठी खुले होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular