28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeKokanगणेशोत्सवासाठी रेल्वेच्या १५६ स्पेशल गाड्या कोकणात धावणार

गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या १५६ स्पेशल गाड्या कोकणात धावणार

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सेंट्रल रेल्वेनं दिलासा देणारी बातमी दिलीय. गणेशोत्सवानिमित्त खास १५६ गाड्या सोडल्या जाणार आहेत. रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगावला मुंबई, पनवेल, पुण्याहून स्पेशल ट्रेन्स असणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत या ट्रेन्स धावतील. यासाठी बुकिंग २७ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेकडून देण्यात आली आहे. मात्र आता तरी तिकिट मिळेल अशी अपेक्षा बाळगायची का? अशी शंका चाकरमानी व्यक्त करत आहेत. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग करता येणार आहे. यासाठी स्पेशल चार्ज असेल. स्पेशल गाड्यांचे थांबे, वेळ यासाठी NTES अॅप किंवा www.enquiry- indianrail.gov.in या संकेतस्थळावरून माहिती मिळेल.

सेंट्रल रेल्वेकडून १५६ गणपती स्पेशल ट्रेन कोकणात धावणार आहेत. यात सर्वाधिक गाड्या मुंबई-सावंतवाडी रोड डेली स्पेशल या असणार असून, एकूण ४० गाड्या या काळात असतील. सीएसएमटीवरून ००.२० वाजता सुटणारी ट्रेन दुपारी २ वाजून २० मिनिटांनी सावंतवाडीत पोहोचेल. या गाडीच्या १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात २० फेऱ्या होतील. तर सावंतवाडीहून दुपारी ३ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी ट्रेन सीएसएमटी स्थानकात दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आडवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळला थांबतील.

लोकमान्य टिळक टर्मिनसवरून कुडाळला गणेशोत्सवात २४ स्पेशल ट्रेन्स असणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनलवरून ०११६७ ही गाडी २२.१५ वाजता सप्टेंबरमध्ये १३, १४, १९, २०, २१, २४, २५, २६, २७, २८ या तारखांना सुटेल. तर ऑक्टोबरमध्ये १ आणि दोन तारखेला सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता कुडाळला पोहोचेल. तर ०११६८ ही ट्रेन कुडाळमधून १४, १५, २०, २१, २२, २५, २६, २७, २८, २९ सप्टेंबर आणि २, ३ ऑक्टोबरला दहा वाजता सुटेल आणि रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी डढढ स्थानकात पोहोचेल.

पुणे – कुडाळ मार्गावरही ६ स्पेशल गाड्या धावणार आहेत. यात १५,२२ आणि २९ सप्टेंबरला गाड्या पुण्याहून सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सुटतील. त्या कुडाळला दुसऱ्या दिवशी दहा वाजता पोहोचतील. तर कुडाळवरून १७, २४ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजून ५ मिनिटांनी सुटणारी गाडी पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. करमाली – पनवेल-कुडाळ ६ गाड्या गणेशोत्सव काळात असणार आहेत. यात १६, २३, ३० सप्टेंबरला करमाळीहून दुपारी पावणे तीनच्या सुम र सुटणारी गाडी मध्यरात्री दोन वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. तर तिथून ५ वाजता सुटणारी गाडी दुपारी दोन वाजता कुडाळला पोहोचेल.

दिवा रत्नागिरी मेमू स्पेशल गणेशोत्सव काळात ४० गाड्या या मार्गावर धावतील. दिवा येथून सकाळी सात वाजून १० मिनिटांनी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात स्पेशल गाडी सुटेल. ही गाडी रत्नागिरीत दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. तर रत्नागिरीतून दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी सुटणारी गाडी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी दिवा स्थानकात पोहोचेल. मुंबई – मडगाव स्पेशल गणेशोत्सवात एकूण ४० गाड्या या मार्गावर धावणार असून सीएसएम टीवरून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी गाडी मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. तर मडगावरून पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी मडगाववरून सुटणारी गाडी सीएसटीएमला सायंकाळी पाच वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. या गाड्या १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात असतील.

RELATED ARTICLES

Most Popular