बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी या जोडप्याने काही न पाहिलेले फोटो शेअर केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
हे फोटो शेअर करत कतरिना कैफने लिहिले, ‘माझे प्रकाश किरण एक वर्षाच्या शुभेच्छा.’ कतरिनासोबतचे काही फोटो शेअर करत विकीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वेळ झपाट्याने निघून जातो, पण माय लव्ह, तो काळ तुझ्यासोबत उत्तम प्रकारे घालवला आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. मी तुझ्यावर कधीही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा जास्त प्रेम करतो.
कतरिना आणि विकी सध्या त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पहाडी भागात साजरा करत आहेत. यादरम्यान कतरिनाने पती विकीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आनंदाने भांगडा करताना दिसत आहे. एकमेकांच्या सहवासामध्ये दोघेही अतिशय खुश आणि आनंदी दिसत आहेत. अनेकांनी त्यांना त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कॅटरिना आणि विकीने गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे लग्नगाठ बांधली. दोघे २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. तर विकी ‘साम बहादूर’, ‘गोविंदा नाम मेरा’ आणि ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये दिसणार आहे.