27.1 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriजिल्ह्यात पावणेदोन लाख नोंदणीकृत लाभार्थी - किसान सन्मान योजना

जिल्ह्यात पावणेदोन लाख नोंदणीकृत लाभार्थी – किसान सन्मान योजना

लाभार्थ्यांनी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील विसावा हप्ता लाभार्थ्यांना २० जूनला वितरित करण्यात येणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ४५७ नोंदणीकृत लाभार्थी असून, त्यामधील ई-केवायसी नसलेले ३ हजार ८८०, बँकखाते आधार संलग्न नसलेले ७ हजार १६९ लाभार्थी प्रलंबित आहेत. शासनाच्या अॅग्रीस्टेक योजनेंतर्गत पीएम किसान लाभार्थ्यांसाठी फॉर्मर आयडी तयार करणे आवश्यक असून, आतापर्यंत १ लाख २५ हजार ७४० लाभार्थ्यांनी फॉर्मर आयडी तयार केला आहे. अद्यापही ४६ हजार ७१७ लाभार्थी प्रलंबित आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सीएससी केंद्र, कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र असलेल्या आणि अॅग्रीस्टेक योजनेंतर्गत फार्मर आयडी तसेच ई-केवायसी व आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी सामायिक सुविधा केंद्राशी संपर्क साधून प्रलंबितता पूर्ण करावी. पीएम किसान योजनेतील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार सीडिंग व फॉर्मर आयडीची पूर्तता २० जूनपूर्वी व्हावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular