26.6 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeSindhudurgदोन डंपरच्या भीषण अपघातामध्ये, एका चालकाच्या जागीच मृत्यू

दोन डंपरच्या भीषण अपघातामध्ये, एका चालकाच्या जागीच मृत्यू

भरधाव डंपर चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा केलेला डंपर न दिसल्यानं हा अपघात घडला.

मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र अजून सुरूच आहे. अवजड वाहनांची वाहतूक जास्त करून रात्रीच्या वेळेमध्ये करण्यात येते. त्यामुळे अंधारामध्ये एकतर वाहने दिसण्यास कठीण जाते त्यामध्ये काही वेळा चालकांच्या डोळ्यावर असलेल्या झोपेमुळे देखील काही वेळा अपघात घडून येतात. अनेक वेळा रस्त्याच्या कडेला चालक वाहने उभी करून थोडा वेळा विश्रांती घेतात आणि मग पुढील प्रवासाला निघतात. मुंबई गोवा महामार्गावर दोन डंपरची भीषण टक्कर झाली असून, एका डंपर चालकाचा त्यामध्ये मृत्यू ओढवला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर डंपरला मागून धडक दिल्यानं दुसऱ्या डंपरमधील चालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या झाराप-पत्रादेवी बायपासवर हा भीषण अपघात झाला. मळगाव इथं उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या दुसऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या मागून आलेल्या भरधाव डंपरमधील चालकाचा जोरात मार बसून जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की डंपर चक्क डिव्हायडरवर चढला आणि मागील डंपरचा चक्काचूर झाला. तर मागून धडक दिलेल्या डंपर चालकाचा मृतदेह डंबरच्या केबिनमध्ये अडकून पडला होता.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव डंपर चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा केलेला डंपर न दिसल्यानं हा अपघात घडला. डोळ्यावर झोप आलेली असल्या कारणानं डंपर चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असाही संशय व्यक्त केला जातोय. डंपरच्या या भीषण अपघातामुळे परशुराम राठोड या २४ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा चालक कर्नाटकातील विजापूरचा असून तो कुडाळच्या गुढीपूर इथं राहायला होता.

RELATED ARTICLES

Most Popular