25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeRatnagiriपी.एम.केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत प्रधानमंत्री मोदी यांनी संवाद साधला

पी.एम.केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत प्रधानमंत्री मोदी यांनी संवाद साधला

याच कार्यक्रमात रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

कोविड मुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी पी एम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत आज प्रधानमंत्री देशपातळीवर झालेल्या एका कार्यक्रमात मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. याच कार्यक्रमात रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे ७ अनाथ बालके यावेळी उपस्थित होती. त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील,  अध्यक्ष बाल न्याय मंडळ निखील गोसावी,  जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर आदी संबंधित उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी बालकांशी संवाद साधला व त्यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेबाबत माहिती दिली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आस्थापूर्वक पालकांशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष करून मला रत्नागिरीला पाठवले आहे असेही सांगितले.

संपूर्ण देश तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे खरे  मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जावा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला. आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत,  तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सारा देश तुमच्या पाठीशी आहे असेही रेल्वे राज्यमंत्री दानवे यावेळी म्हणाले.

कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या सुमारे ९ आहे. त्यातील ७ जण आज उपस्थित होते त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular