24.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRajapurराजापूरात पुन्हा अपघात ! चालकाच्या मृतदेहाचे २ तुकडे

राजापूरात पुन्हा अपघात ! चालकाच्या मृतदेहाचे २ तुकडे

या अपघातामुळे अवैध व ओव्हरलोड वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर डोंगरतिठा येथे आठवडाभरापुर्वीचा कंटेनर अपघात ताजा असतानाच या बुधवारी महामार्गावरच वाटूळ नजिकच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर उलटून झालेल्या अपघातात डंपरचालक जागीच ठार झाला. दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या केबिनने पेट घेतल्याने डंपरही जळून खाक झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव विष्णू शिवाप्पा पामर (२८) असे असून तो कर्नाटक राज्यातील बेळगाव वैभवनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ओणीकडून विलवडेकडे वाळू भरून जात असताना वाटूळ येथील तीव्र उतारावरील वळणावर चालकाचा डंपरवरील ताबा सुटला.

यामुळे वाळू भरलेला डंपर नजिकच्या २५ ते ३० फुट खोल दरीत कोसळला. यामध्ये चालक जागीच ठार झौला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की डंपर चालकाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. कंबरेखालील भाग डंपरमध्ये अडकला होता. तर धड वेगळे होऊन बाहेर फेकले गेले. अपघातानंतर डंपरच्या केबीन आणि ट्रॉलीचे दोन भाग होवून केबीन जळून खाक झाली. यात चालकाच्या शरीराचा काही भाग जळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राजराम चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राजापूर नगर परिषदेच्या अग्नीशमन बंबाद्वारे पेट घेतलेला डंपर विझविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत. या अपघातामुळे अवैध व ओव्हरलोड वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या बुधवारी झालेल्या कंटेनर अपघात एकाचा बळी गेला होता. आठवडाभरात पुन्हा झालेल्या अपघाताने रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आली आहे. प्रशासनाची डोळेझाक अशा अपघातांना कारणीभूत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ओणी मंदरूळ येथून खाणीतून ही वाळू वॉशिंगसाठी विलवडे येथील प्लॅटवर नेली जाते. यासाठी योग्य ते परवाने घेणे आवश्यक असताना ते घेतले जात नाहीत. तर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळूचा भरणा करून बेधडकपणे दिवसरात्र वाहतूक केली जाते. बुधवारी झालेला अपघात हा डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्याने वाटूळ उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला व त्यात या चालकाला आपला जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट दिसले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular