28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeChiplunतेरा लाखांची फसवणूक, चौघांवर गुन्हा

तेरा लाखांची फसवणूक, चौघांवर गुन्हा

२७ सप्टेंबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ या या कालावधीमध्ये त्या डेव्हलपर्स संस्थेत घडला होता.

तालुक्यातील एका डेव्हलपर्समधील चार जणांनी १३ लाख ३२ हजार ५५१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ या या कालावधीमध्ये त्या डेव्हलपर्स संस्थेत घडला होता. मनोज आबा पवार, मिथून आबा पवार, दीपक देवराम साळुंखे व राम जाधव ( पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या चार संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी चेतन जयसिंग चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, २०१६ मध्ये चारही संशयितांनी खेड तालुक्यातील एका डेव्हलपर्स संस्थेसाठी ११ गुंठ्यामधील रो हाऊस / बंगला खरेदी करण्याबाबत चेतन चव्हाण यांची मनधरणी केली.

तसेच चव्हाण यांना या प्रकल्पामधून जास्त परताव्याचे अमिष दाखविण्यात आले. चव्हाण यांच्याकडून २७ सप्टेंबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ या मुदतीत १३ लाख ३२ हजार ५५१ रुपये घेऊन चव्हाण यांच्या बंगल्याचे काम पूर्ण न करता, जागा न देता, पैसे न परत करता अर्थिक फसवणूक केली. चव्हाण यांनी विश्वासाने दिलेल्या रकमेतून संशयित मनोज पवार, मिथून पवार व दीपक साळुंखे यांनी बंगल्याचे काम पूर्ण न करता दुसरीकडे १० एकर जागा खरेदी करुन चव्हाण यांचे रकमेचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मनोज पवार, मिथुन पवार व दीपक साळुंखे तसेच एका फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक राम जाधव यांनीही चव्हाण यांच्या परवानगी शिवाय मंजूर असलेल्या कर्जातून वरील रक्कम न विचारता डेव्हलपर्स यांना दिली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मनोज आबा पवार, मिथुन आबा पवार, दीपक देवराम साळुंखे आणि राम जाधव (पूर्ण नाव माहीत नाही.) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular