28.9 C
Ratnagiri
Tuesday, June 17, 2025

जिल्ह्यात पाच महिन्यांत १२ बेवारस मृतदेह

नदी, समुद्रकिनारी, खाजणात, जंगलात किवा अगदी निर्जनस्थळी...

अंतिम प्रभाग रचना एक सप्टेंबरला होणार जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत....

खेडच्या नाट्यगृहाचा पडदा दोन दशकांनी उघडणार

शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल...
HomeRatnagiriप्रत्येक गावामध्ये नवीन कोविड सेंटरची निर्मिती

प्रत्येक गावामध्ये नवीन कोविड सेंटरची निर्मिती

जिल्हा परिषदेच्या पत्रकार परिषदेमध्ये नाम. उदय सामंत यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या गावांची लोकसंख्या २ हजार पेक्षा जास्त आहे अशा दोनशे गावांमध्ये नवीन कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. सगळीकडे आता होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याने जर एकाच वेळी अधिक संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असता त्यांचे एका घरात उपचार करणे अडघड बनू शकते. आणि कोरोनाचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील वाढत जाणारा संसर्ग पाहता शासनाने होम आयसोलेशन सुद्धा बंद केल्याने मग अशा रुग्णांची कुठे आणि कशी सोय केली जाणार ! असा प्रश्न जनतेला पडला आहे.

त्यावर उत्तर देताना नाम. सामंत यांनी सांगितले कि, यासाठी संस्थात्मक विलगीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे २०० गावांमध्ये ज्यांची लोकसंख्या २००० पेक्षा जास्त आहे त्या प्रत्येक गावामध्ये दहा बेडसचे संस्थात्मक कोविड सेंटर सुरु करणार असून त्याच्यावर पूर्णतः नियंत्रण जिल्हा परिषदेचे राहील. वा या केंद्रांसाठी उद्भवणारा सर्व खर्च १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या निधीमधून केला जाईल. तसेच कमी लोकसंख्या असलेल्या गावामधून सुद्धा कमी बेड्सची व्यवस्था असणारे सेंटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांचे संस्थात्मक कोविड सेंटर मध्ये उपचार झाल्यावर संसर्गही आटोक्यात येईल आणि शासनाने होम आयसोलेशन बंद केल्याने मग अशा रुग्णांची कुठे आणि कशी सोय होणार यावर प्रश्नावर मार्ग निघेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उद्य बने, डॉ. इंदुराणी जाखड, परशुराम कदम इ. उपस्थित होतेत.     

RELATED ARTICLES

Most Popular