25.1 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriएक अनोखा उपक्रम

एक अनोखा उपक्रम

पावस येथील ग्रामपंचायत सदस्य असलेले अविनाश काळे हे जानेवारीमध्ये झालेल्या प्रभाग क्र.४ च्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे होतेत. त्यामुळे गोळप पंचक्रोशी बद्दल त्यांना नक्कीच जवळीक आहे. शेतीचा हंगाम सुरु व्हायला आता थोडाच अवधी उरला आहे. आणि सध्या असलेल्या लॉकडाऊन मुळे शेतकर्यांना चांगले वाण आत्ता मागणीनुसार बांधावर देण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.

पावस मधील अविनाश काळे यांनीही एक आगळा वेगळाच उपक्रम राबविला आहे. भात शेती शिवाय इतरही काही उत्पन्न घेता यावे यासाठी त्यांनी विविध भाज्यांची बियाणी एका पाऊचमध्ये घालून साधारण २५० कुटुंबियांना घरोघर जाऊन त्याचे वाटप केले आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी आनदाने स्वागत केले आहे. कोरोनाच्या काळामध्ये भाजीपाला, फळे ठराविक वेळेनंतर मिळणेही कठीण बनले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्यांच्या बियाणांची घरच्या घरी आवार परिसरामध्ये लागवड करून उत्पन्न घेता येऊ शकते. त्यामुळे जरी लॉकडाऊन झाले किंवा काहीही अडचणी आल्या तरी घरच्या घरी भाज्यांचा उत्पन्नावर उदरनिर्वाह करता येऊ शकतो.

शेतीचा हंगाम सुरु झाला कि, वन्य प्राण्यांचा सुद्धा त्रास वाढू लागतो. त्यामुळे ते गृहीत धरूनच निदान काही प्रमाणात तरी घरच्या उपयोगासाठी भाजीपाला मिळू शकतो. आणि काकडी, पडवळ,भेंडी,कारले,चिबूड,दुधी,घेवडा,गवार,दोडका, चवळी इत्यादी सारखी बियाणी जर मोफतपणे वाटली तर लोक त्याची नक्कीच लागवड करून उत्पन्न घेण्यास सुरुवात करतील. सध्याच्या कोरोनाच्या नैराश्यमय काळामध्ये काहीतरी सकारात्मक काम करण्याचा दृढ निश्चय होता, तो या मार्गाने पूर्ण करता आला त्याबाबत समाधान वाटते असे काळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular