30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeRatnagiriगुहागर येथील प्रौढाची २१ लाखांची फसवणूक

गुहागर येथील प्रौढाची २१ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास एक महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो.

गुहागर तालुक्यात शेअर्स मधून १ महिन्यात पैसे डबल करून देतो असे आमिष दाखवत. २१ लाखांची फसवणूक झाली आहे. तेथील नर्सरी चालकाने कर्ज, उधारी, सोने गहाण ठेवून गोळा केलेल्या २१ लाखांवर पाणी सोडण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही घटना गर्वर्षी २०२२ च्या डिसेंबर महिन्यात घडली असून खेड  येथील एका भामट्याने फिर्यादीसह अन्य एकाला १९ लाखाला फसवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात घटनेच्या १ वर्षानंतर तक्रार देण्यात आली असून ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुगदिवीवाडी, गुहागर येथील प्रतीश शंभू राजपुरे (४९, रा. गुहागर वरचा पाठ दुर्गादेवी वाडी) यांनी नरेश भागोजी सणस (रा. मांडवे खेड) याच्याविरुद्ध तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे.

फिर्यादी प्रतिश राजपुरे हे शेती, नर्सरी, कलमे बांधण्याचे काम करतात. गतवर्षी २०२२ च्या गणपतीमध्ये त्यांची ओळख नरेश सणस या खेड येथील व्यक्तीशी झाली. त्यानंतर नरेश ‘सणस यानें राजपुरे यांच्याशी संपर्क आणि परिचय वाढवला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास एक महिन्यामध्ये दुप्पट परतावा मिळतो, तुम्हालाही एक महिन्यात तुमचे पैसे डबल करून देतो असं आमिष नरेश सणस याने प्रतिश राजपुरे यांना दाखवलं. त्यासाठी तो वारंवार त्यांच्या घरी येत असे. सणस याच्या भूलथापान बळी पडत प्रतीश राजपुरे नरेश सणस याला ८ डिसेंबर २०२२ ते १७ डिसेंबर २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी रक्कम असे एकूण २१ लाख रुपये दिले.

या पैशाचे १ महिन्यांनी जानेवारी २०२३ पैसे डबल करून देतो असे नरेशने सांगितले. २१ लाख रुपये सणस याला देण्यासाठी राजपुरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कर्ज काढून, उधारी घेऊन, सोन्याचे तारण करून, स्वतःच्या पत्नीच्या नावाने पैसे घेऊन मुलीकडून पैसे घेऊन २१ लाख रुपये या कालावधीत उभे केले होते. त्याच वेळेला नरेश सणस याने राजपुरे यांच्याकडे एक बॅग देत या बॅगेमध्ये म ाझ्यासह चार पार्टनरचे पैसे असून बॅगचे लॉक आमच्या चौघांच्या कोडनेच उघडते, ही बॅग जपून ठेवा असं सांगून नरेश सणस तिथून निघून गेला. एक महिना उलटून गेल्यावर जानेवारी २०२३ ला राजपुरे यांनी सणस याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि पैशाची मागणी केली. मात्र सणसने आपला रंग बदलला आणि पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

मार्च २०२३ मध्ये सणस गुहागर येथून वेळणेश्वर येथे राहायला गेला. राजपुरे यांनी त्यांची भेट घेण्याचा असफल प्रयत्न केला. दरम्यान मे २०२३ मध्ये राजपुरे यांची भेट गुहागर बाजारपेठेमध्ये किशोर गांधी यांच्याशी झाली. त्यावेळी किशोर गांधी यांनीही शेअर मार्केटमध्ये गुंतवून पैसे डबल करण्यासाठी नरेश सणस याला आपण १९ लाख रुपये दिल्याचे सांगितले. तसंच किशोर गांधी यांच्याकडेही सणस याने एक बॅग चार पार्टनरचे पैसे आहेत असं सांगून दिली होती, ती बॅग उघडली असता त्यात रद्दीचे कागद असल्याचं निष्पन्न झाल्याचं. गांधी यांनी राजपुरे यांना सांगितये. यामुळे हादरलेल्या राजपुरे यांनी सुद्धा आपल्या घरी जाऊन त्यांच्याकडील बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये सुद्धा रद्दीचे कागद सापडले.

त्यानंतर राजपुरे आणि किशोर गांधी यांनी नरेश सणस याची माहिती काढण्यास सुरुवात केली असता तो पनवेल येथील गीतांजली हॉटेल येथे राहायला असल्यांची माहिती मिळाली. त्यानंतर २९ मे २०२३ रोजी किशोर गांधी आणि राजपुरे दोन सहकाऱ्यांसह पनवेल येथे गेले आणि त्यांनी नरेश सणस याच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे खेडला आहेत, मी तुम च्यासोबत येतो असे सांगत सणस त्यांच्या गाडीतून खेड येथे आला. पैसे घरात आहेत असे सांगून गाडीतून खाली उतरला आणि राजपुरे, गांधी यांच्या हातावर तुरी देऊन त्याने तेथून पळ काढला. आपण पुरते फसवले गेलो असल्याचे लक्षात आल्यानंतर राजपुरे यांनी गुहागर पोलीस स्थानकात धाव घेत नरेश सणस याच्या विरोधात तक्रार दिली असून सणस याच्याविरुद्ध पोलिसांनी भा. दं. वि. क. ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular