23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यात २८ वाहनांच्या चोरीची नोंद…

जिल्ह्यात २८ वाहनांच्या चोरीची नोंद…

एकूण २८ पैकी १२ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

दुचाकी चोरट्यांचे रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी होण्याच्या घटना इतर जिल्ह्यांच्या तुलनेने फारच कमी झाल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात २४ दुचाकींची आणि अन्य ४ वाहनांची अशी एकूण २८ वाहनांची चोरी झाल्याची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. दरदिवशी दोन, तीन दुचाकी चोरीस जात होत्या. चोरटे एवढे माहीर होते की, विनाचावी दुचाकीचे कनेक्शन थेट करून ते गाडी चोरायचे किंवा हॅण्डल लॉक असले, तरी ते तोडून चोरी करायचे. काही दुचाकी चोरल्यानंतर काही मिनिटांत त्याचे सुट्टे भाग करून अदलाबदल केली जात होती.

त्यामुळे अनेकवेळा चोरट्यांनी यापद्धतीने पोलिसांना गुंगारा दिला होता; परंतु रत्नागिरी पोलिस आणि कोल्हापुरातील पोलिसांनी या गैंग पकडल्या आणि त्यानंतर दुचाकी किंवा इतर वाहने चोरण्याचे प्रमाण कमी झाले; परंतु ते बंद झालेले नाही. पोलिस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात शहराच्या ठिकाणीच दुचाकी चोरी होत असल्याचे दिसते. रत्नागिरी शहराचा विचार करता रत्नागिरीनजीकच्या कुवारबाव येथील रेल्वेस्थानकावर तसेच शहरातील मारुती मंदिर भागात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. बरेचदा दुचाकी लावल्यानंतर त्याचे हॅण्डल लॉक न करता चालक निघून जातात.

त्यामुळे चोरट्यांना त्या पळवून नेणे सोपे होते. काही चोरटे थेट कनेक्शन करून किंवा हॅण्डल लॉक तोडून ही चोरी करतात. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्ह्यात २४ दुचाकींची विविध भागांतून चोरी झाली आहे तसेच चोरट्यांनी अन्य ४ वाहनेही चोरून नेली आहेत. अशी आठ महिन्यांत एकूण २८ वाहनांची चोरी झाली आहे.

१२ वाहनांचा लागला शोध – चोरीला गेलेल्या २४ दुचाकी आणि ४ अन्य वाहने, अशा एकूण २८ पैकी १२ वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोऱ्या उघड झाल्या असून, न्यायालयाच्या परवानगीने ही वाहने संबंधितांना देण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular