26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRajapurरिफायनरी विरोधी आंदोलन ३३ आरोपी सुनावणीला हजर

रिफायनरी विरोधी आंदोलन ३३ आरोपी सुनावणीला हजर

राजापूर कोर्टात ६० हून अधिक ग्रामस्थांचा कट्टर रिफायनरी विरोधी समूह उपस्थित होते.

बारसू परिसरात २८ एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले. होते. प्रकरणाची सुनावणी पार पडली. या वेळी ३३ आरोपी आरोपी हजर होते. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली. या वेळी ३३ आरोपी आरोपी हजर होते, अशी माहिती रिफायनरी विरोधी संघटनेच्या नेत्यांनी दिली. बारसु -धोपेश्वर येथे प्रस्तावित प्रदूषणकारी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पापासून स्वतःचे गाव वाचविण्यासाठी काही गावातील तर काही मुंबईहून २८ एप्रिल २०२३ रोजी बारसु – गोवळ-धोपेश्वरच्या सड्यावर एम आय डी सी मार्फत रिफायनरी कंपनीसाठी माती परीक्षण केले जात होते. त्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

त्या दिवशी आंदोलकांना अटक करून सोडून देण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर विविध कलम खाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. चार्जशीट दाखल होऊन मंगळवारी ५ सप्टेंबरला कोर्टात हजर रहाण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यामध्ये काही आरोपी मुंबईहून आले होते. राजापूर कोर्टात ६० हून अधिक ग्रामस्थांचा कट्टर रिफायनरी विरोधी समूह उपस्थित होते. यापुढेही याच आंदोलनातील केसमध्ये ११२ आरोपी आहेत ज्यात १०५ महिला व ७ पुरुष (२५ एप्रिल) आणि १६४ महिला (२८ एप्रिल) आरोपी यांचे जामीन अजून व्हायचे आहेत. त्याच्या तारखा याच महिन्यात आहेत. काही जणांवर ३५३ कलम लावण्यात आले आहे. १४ जण तुरुंगात जाऊन आले आहेत. तडीपारीच्या कारवाईच्या सूनावण्या सुरू आहेत, अशी माहिती रिफायनरी विरोधी संघटनेच्या नेत्यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular