26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeRatnagiriलाडकी बहिण योजनेच्या प्रसारासाठी चहापाण्यावर तब्बल ३५ लाख खर्च !

लाडकी बहिण योजनेच्या प्रसारासाठी चहापाण्यावर तब्बल ३५ लाख खर्च !

रत्नागिरी तालुक्याचीच सर्वांत जास्त १५ लाखाची बिल आहेत.

राज्यात मोठा गाजावाजा झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची सुरवात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य कार्यक्रमाने रत्नागिरीत झाली. आजही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला ६१ कोटी रुपये वाटप होत आहेत. परंतु तेव्हाच्या कार्यक्रमाला चहा, नाष्टा, पाणी याचे बील तब्बल ३५ लाख इतके झालें आहे. पुरविणारे पुरवठादार मात्र अजून त्यांच्या ३५ लाखाच्या बिलांपासून वंचित आहेत. महसुल विभाग म्हणतो आम्ही बिलं दिली आणि जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग म्हणतो आमच्यापर्यंत बिलं पोहचली नाही. या दोन्ही विभागाच्या वादात पुरवठादार मात्र चांगलाच भरडला आहे. महायुतीच्या गेल्या सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आणि या योजनेने सत्ताधाऱ्यांबाबतचे मतच पालटुन टाकले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहिर केली आणि त्याचा लाभही सुरू झाला. पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या सर्व महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले गेले.

या योजनेचा थेट लाभ गरजवंत महिलांना झाल्याने योजनेचा राज्यात चांगलाच गाजावाजा झाला. आचारसंहिता लागण्यापूर्वी पुढील दोन महिन्यांचे पैसे देखील आधीच महिलांच्या खात्यात जमा झाले. या योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी रत्नागिरी चंपक मैदानावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम घेण्यात आला. २१ ऑगस्ट २०२५ हा कार्यक्रम झाला. सुमारे पन्नास ते बावन्न हजार महिला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होता. शासनाचा हा कार्यक्रम असल्याने येणाऱ्या महिलांची ने-आण करण्यापासून त्यांच्या चहा, नाष्टा, पाणी आदीची व्यवस्था प्रशासनावर होती. त्यानंतर तालुक्याअंतर्गत झालेल्या या योजनेच्या मेळाव्यांना देखील जिल्हा नियोजन म्हणून प्रत्येत तालुक्याला अडीच लाख रुपये देण्यात आले होते. एसटींच्या खर्चाचा भार महसुल विभागाकडे होता. तर महिलांच्या चहा, नाष्टा, पाण्याच्या खर्चाची जबाबदारी जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागावर होती. त्यांच्या मार्फत पुरवठादारांना निधी वितरित केला जाणार आहे.

जिल्हाधिकान्यांच्या आदेशानेच हे होणार आहे. रत्नागिरी तालुक्याचीच सर्वांत जास्त १५ लाखाची बिल आहेत. परंतु महसुल विभागाकडुन अजूनही पुरवठादारांची बिलं न आल्याने सहा महिने झाले तरी बिलं निघालेली नाही. पुरवठादार त्यामुळे अडचणीत आहेत. शासनाचा ३५ लाखाचा निधी आला आहे. परंतु बिल न आल्यामुळे तो वितरित केला नसल्याचे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर महसुल विभाग म्हणतो आम्ही बिल सादर केली आहेत. दोन्ही विभागाच्या या वादामुळे पुरवठादार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा चंपक मैदानावर झालेल्या कार्यक्रमाचा ३५ लाखाचा निधी शासनाकडुन प्राप्त झाला आहे. परंतु पुरवठादारांची महसुल विभागाकडुन बिलं न आल्यामुळे तो. वितरित झालेला नाही. आम्ही ङ्गबिल मागवून घेतली असून येत्या आठ दिवसात ती अदा केली जातील. असे महिला व बाल कल्याण विभाग अधिकारी श्रीकांत होवाळे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular