27.1 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeMaharashtraराज्यात कोरोनाच्या ८६ नव्या रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक ३६ रुग्ण दाखल

राज्यात कोरोनाच्या ८६ नव्या रुग्णांची भर, मुंबईत सर्वाधिक ३६ रुग्ण दाखल

कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ३८३ वर पोहोचली आहे.

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. बुधवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे ८६ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ३८३ वर पोहोचली आहे. बुधवारी राज्यात कोरोनामुळे कुणाचाही मूत्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. घाबरुन न जाण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन सध्या कोविडसाठी महाराष्ट्रामध्ये ILI (Influenza like Illness) आणि SRI (Severe cute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविड साठी चाचणी केली जाते. सदर कोविड रुग्णांना पॉझिटिव आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.

राज्यातील कोरोनाची आकडेवारी :- जानेवारी २०२५ पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या – ८८६८, जानेवारी २०२५ पासून पॉझीटीव रुग्ण – ५२१, आतापर्यंत. बरे झालेले रुग्ण १३२

बुधवारी सापडलेले रुग्ण – ८६ (मुंबई-३६, पुणे मनपा-९, पिंपरी चिंचवड मनपा-३, ठाणे मनपा-२४, कल्याण मनपा २, नवी मुंबई मनपा ४, पनवेल मनपा ४. नागपूर मनपा अहिल्यानगर मनपा २, रायगड -१). सक्रिय रुग्णसंख्या ३८३ जानेवारी २०२५ पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या ३५२ सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular