मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासीय प्रवासी जनत्तेकडून दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. पूर्वीची गाडी क्र. ५०१०४/५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजरची आता रत्नागिरी-दिवा पॅसेंजर झाली आहे. या गाडीसोबत जुनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी व सध्या बंद अवस्थेत असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा पूर्वीप्रम ाणेच दादरहून सोडण्यात यावी. तसेच संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डब्बे पूर्ववत करावेत, अशी मागणी मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासीय प्रवासी जनतेकडून करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेविषयक अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी अनेक निवेदने रेल्वे प्रशासनाला दिली आहेत. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
दिवा रत्नागिरी एक्स्प्रेस पकडण्यासाठी सध्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्वीची गाडी क्र. ५०१०४/५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजरची आता रत्नागिरी-दिवा पॅसेंजर झाली आहे. कोविडपूर्व काळात रत्नागिरी दादर पॅसेंजरला दोन आरक्षित डबे होते. तसेच संगम`श्वर, चिपळूण व खेड येथे प्रत्येकी एक अनारक्षित ‘डबा उघडत असे. . रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांतून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढणे हे अद्यापही एक मोठे दिव्यच आहे. संबंधित स्थानकात पोहोचण्याआधीच गर्दीने ओसंडून वाहत असल्यामुळे आरक्षण असूनही एखाद्याला आपली आरक्षित जागा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे, येथील प्रवाशांना त्या त्या स्थानकात उघडणाऱ्या अनारक्षित डब्यांचा मोठा आधार होता. परंतु आता आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत, अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे.