28.1 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यात बंदर विकासासाठी ३७० कोटी मंजूर

जिल्ह्यात बंदर विकासासाठी ३७० कोटी मंजूर

महाराष्ट्रातील नऊ मत्स्य साठवण केंद्रे बांधण्यास मान्यता दिली आहे.

कोकणच्या सागरी किनारपट्टीतील १८ मच्छीमारी बंदरांच्या परिपूर्ण विकासासाठी केंद्र सरकारने तब्बल ३५३९.८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांसाठी ३७० कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या बंदरांचा लवकरच कायापालट होणार आहे. कोकणातील एकूण ९ मासेमारी बंदर प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यापैकी ४ प्रकल्पांना बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्य व्यवसाय विभागाशी अभिसरण पद्धतीने आणि पाच प्रकल्पांना मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यशेती पायाभूत सुविधा (एफआयडीएफ) अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाने मंजुरी दिली आहे.  शासनाने मत्स्य व्यवसाय विभागाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने (पीएमएमएसवाय) अंतर्गत हा कार्यक्रम आहे.

महाराष्ट्रातील नऊ मत्स्य साठवण केंद्रे बांधण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील मत्स्य साठवण केंद्रे प्रकल्पांतर्गत एकूण ९ मत्स्य उतरणी केंद्रांसाठी एकूण ११४२.६० कोटीचा निधी दिला आहे. यामध्ये दाभोळ (जि. रत्नागिरी) ९.३९ कोटी, पालशेत, गुहागरसाठी ८.३४ कोटी, असगोली, गुहागरसाठी ८.८३ कोटी, बुधल, गुहागर ६.५७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडीम मच्छीमारी बंदरासाठी १८८.४४ कोटी, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे (दापोली) मच्छीमारी बंदरासाठी २२१.३४ कोटी व साखरीनाट्ये (ता. राजापूर) मच्छीमारी बंदरासाठी १४६.९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular