25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeRatnagiriदोन्ही प्रकल्पांतून ३८ हजार रोजगार - 'वेल्लोर व डिफेन्स'

दोन्ही प्रकल्पांतून ३८ हजार रोजगार – ‘वेल्लोर व डिफेन्स’

हा प्रदूषणविरहित प्रकल्प असून, देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे.

१९ हजार ५५० कोटींच्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी रत्नागिरीतील १ हजार ५०० युवकांना परदेशात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना रत्नागिरीतील प्रकल्पात रोजगार संधी मिळेल त्याचबरोबर धीरूभाई अंबानी यांच्या डिफेन्स क्लस्टरमधून देशाच्या संरक्षणाचा प्रदूषणविरहित प्रकल्प होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांतून ३८ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्पांचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. एमआयडीसीच्या झाडगाव ब्लॉकमध्ये वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला व्हीआयटी सेमीकॉन्स पार्कचे संचालक ताजपूर संपथ कण्णन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उद्योजक दीपक गद्रे, प्रशांत पटवर्धन, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, सचिन राक्षे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, सरपंच फरिदा काझी, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, व्हीआयटी पार्क प्रकल्प हा अमेरिकन बेस कंपनीचा असून, भारतात तामिळनाडू हे बेस आहे. मुलांनी शिकून परदेशात नोकरीसाठी जावे, असे आई-वडिलांचे स्वप्न असते; परंतु ते स्वप्न या प्रकल्पामध्येच पूर्ण करता येऊ शकेल. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या थेट दोन हजार कर्मचाऱ्यांपैकी १ हजार ५०० रत्नागिरीतील असतील.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि पहिल्या पाचमध्ये रत्नागिरीचा जीडीपी आणण्यासाठी अशा प्रकल्पांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. डिफेन्स क्लस्टर्सचा दुसरा उद्योग रत्नागिरीत आणला आहे. हा प्रदूषणविरहित प्रकल्प असून, देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे. तीन वर्षांनंतर इथे तयार झालेली बंदूक सैनिकांच्या हातामध्ये असतील. अशा प्रकल्पांचे समर्थन सर्वांनी मिळून केले पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी पटवर्धन यांनीही मनोगत व्यक्त केले.

रत्नागिरीचा जीडीपी पहिल्या पाचमध्ये – सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळावर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यावर महाराष्ट्रात रत्नागिरीत सर्वप्रथम आम्ही येत आहोत. सेमीकंडक्टरमध्ये तैवान, चीन आणि हाँगकाँग यांची मक्तेदारी आहे. या सर्वांचा लीडर म्हणून तैवानकडे पाहिले जाते. इथून पुढे ‘मेड इन इंडिया’ म्हणून या प्रकल्पातील उत्पादने नावारूपाला येतील. भविष्यात पहिल्या पाचमध्ये रत्नागिरीचा जीडीपी असेल. रत्नागिरीतील नव्या पिढीसाठी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. ३३ हजार ६२० रोजगार संधी यामधून उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागेल, असे संचालक कण्णन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular