20.9 C
Ratnagiri
Wednesday, January 7, 2026

मॅरेथॉन उपक्रमामध्ये मराठीचा वापर – प्रसाद देवस्थळी

कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या तिसऱ्या वर्षी मराठी भाषेचा...

कोंडगावची घंटागाडी सात महिने धूळ खात

कोंडगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेली घंटागाडी तब्बल सात...

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघसंवर्धनाला गती…

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा...
HomeRatnagiriमहाराष्ट्रातील पहिले तर भारतातील ५वे अॅक्टीव थ्रीडी तारांगण रत्नागिरीला देतेय नवी ओळख

महाराष्ट्रातील पहिले तर भारतातील ५वे अॅक्टीव थ्रीडी तारांगण रत्नागिरीला देतेय नवी ओळख

शाळा, महाविद्यालयांच्या सहली मोठ्या संख्येने रत्नागिरीत येत आहेत.

तीन वर्षांपूवीं महाराष्ट्रातील पहिले तर भारतातील पाचवे ऍक्टीव थ्रीडी तारांगण रत्नागिरीत उभारण्यात आले आहे रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे व पाठपुराव्यामुळे हे तारांगण उभे राहिले असून विद्यार्थी, अभ्यासक व पर्यटकांसाठी हे तारांगण आकर्षण ठरेल आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांच्या सहली मोठ्या संख्येने रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्यासाठी तांरागण ही विशेष पर्वणी ठरत आहे. या तारांगणातील विविध शो मध्ये चंद्राचा पृष्ठभाग कसा दिसतो याचे जवळून दर्शन घडते. लघुग्रह कसे आदळतात याचाही अनुभव घेता येईल. स्टेट ऑफ द आर्ट ऍक्टिव्ह स्टिरिओ थ्रीडी तारांगणामध्ये खगोलीय वस्तूचे प्रत्यक्ष अनुभव (रिअल टाइम) देणारे आणि तारांगणाचे गुंग करणारे थ्रीडी शो दाखवले जातात. भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील म ार्गदर्शक तत्वांना अनुसरून रत्नागिरी नगर परिषदेने तारांगण (प्लॅनेटेरियम) आणि विज्ञान भवन (सायन्स पार्क) विकसित करण्यासाठी उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. रत्नागिरी येथील हे तारांगण महाराष्ट्राचे पहिले तर भारतातील पाचवे ऍक्टीव थ्रीडी तारांगण आहे.

डिजिस्टारचे डिअर-टाइम ग्राफिक इंजिन प्रगत भौतिकशास्त्रावर आधारित प्रस्तुतीकरण प्रणालीमुळे ग्रहांच्या पृष्ठभागावरील अत्यंत सूक्ष्म तपशील प्रस्तुत करण्यास सक्षम आहे. डिजिस्टारचे हे सॉफ्टवेअर अमेरिकेच्या नासाच्या डिजिटल युनिव्हर्समधील डेटा बेसच्या आधारे विकसित केलेले आहे. डिजिस्टार रिअल टाइममध्ये आकारमानात्मक (व्हॉल्यूमेट्रिक) डेटा प्रस्तुत करण्यासाठी एक अत्यंत प्रगत अल्गोरिदम वापर असल्यामुळे अंतरिक्षातील ढग, नक्षत्रसमूह आणि आकाशगंगा हे सर्व प्रत्यक्ष आकारमानाच्या स्वरूपात प्रदर्शित केले जाऊ शकतात. आधुनिक आणि ऐतिहासिक अवकाशयान निरीक्षणे, धुमकेतू, लघुग्रह आणि अशी बीच माहिती देणारी डिजिस्टारची १०० हून अधिक प्रत्यक्षदर्शी (रिअल टाइम मॉडल्स) उपलब्ध आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत रत्नागिरीकरांवरच नव्हे तर कोकणासह संपुर्ण महाराष्ट्रात या तारांगणाबाबत खगोल प्रेमींमध्ये कुतुहल वाढलेले पाहायला मिळते. रात्री आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचे निरिक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे हे तारांगण आणि विज्ञान भवन रत्नागिरीमधील जिज्ञासू मुलांसाठी प्रमुख रंजक आणि उदबोधक केंद्र बनले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular