26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeRatnagiriलाडकी बहीण' योजनेचे ४ लाख लाभार्थी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

लाडकी बहीण’ योजनेचे ४ लाख लाभार्थी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

महिला लाभार्थ्यांबाबत अंगणवाडी, आशा, एनआरएचएम विभागाकडूनही माहिती घेतली जात आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटांत जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी होऊ शकणार आहेत. या संभाव्य लाभार्थी महिलांचे अर्ज प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंह म्हणाले, ‘नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या असल्याने, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील १८ वयाच्या पुढील महिला मतदारांची संख्या ५ लाख ४६ हजार १७२ आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटाच्या महिलांची संख्या सुमारे ४ लाख ७ हजार ५१ इतकी आहे. ही संख्या संभाव्य महिला लाभार्थ्यांची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये दापोली-खेड-मंडणगडमध्ये सुमारे १ लाख १७ हजार ९१७, गुहागर चिपळूण-खेडमध्ये १ लाख १ हजार २३, चिपळूण-संगमेश्वरमध्ये १ लाख १२ हजार ८६, रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये १ लाख १९ हजार ६८७ तर राजापूर लांजा-साखरपामध्ये ९५ हजार ३५९ संभाव्य महिला लाभार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत महिला लाभार्थ्यांबाबत अंगणवाडी, आशा, एनआरएचएम विभागाकडूनही माहिती घेतली जात आहे.

ही योजना जाहीर झाल्यापासून २३६ ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत तर ३ हजार ५८५ ऑफलाईन अर्ज महिलांनी जमा केले आहेत. पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे ठिकठिकाणी शिबिरेही आयोजित केली जात आहेत. रत्नागिरीसाठी वीर सावरकर नाट्यगृहामध्ये अर्ज भरुन घेण्यासाठी शनिवार ६ जुलैला विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ते सुरु राहणार आहे. याठिकाणी पाच हजार अर्जही वितरणासाठी ठेवण्यात आले आहेत.

याठिकाणी १० टेबल लावण्यात येणार असून लाडकी बहीणसह रेशनकार्ड व अन्य दाखल्यांचे वितरणही केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याचा प्रारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. अशाच प्रकारचा उपक्रम रविवारी लांजा व राजापूरमध्ये तर सोमवारी चिपळूणमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular