26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriकाजू शेतकऱ्यांना १० रुपयांचे अनुदान राजा झाला उदार, दमडी टेकवली हाती!

काजू शेतकऱ्यांना १० रुपयांचे अनुदान राजा झाला उदार, दमडी टेकवली हाती!

शेतकऱ्यांचे काजूच्या पिकात मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

कोकणातील शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलेल्या निसर्गाच्या अवकृपेमुळे काजू उत्पादनात घट झाली आहे. जे काही उत्पादन झाले त्याला भाव नाही त्यामुळे काजू शेतकरी हवालदिल झाला आहे. काजूला योग्य भाव द्या अशी मागणी आहे. पण सरकारने सतत त्याकडे दुर्लक्ष केले आहेत. पुढील विधानसभा निवडणुका लक्षात घेता कोकण व घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांना प्रति किलो १० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात १.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून १.८१ लाख टन आहे. राज्यात काजूची उत्पादन क्षमता हेक्टरी ९८२ किलो आहे. यावेळी काजू उत्पादकांना उत्पन्न कमी मिळाले म्हणून पणन विभागाने १३ मार्च रोजी एक प्रस्ताव ठेवला होता. तो शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजूर झाला आहे.

मोठे आर्थिक नुकसान – यावेळी कांजूला बाजारात भाव प्रति किलो ११० रुपये दर मिळाला. शेतकऱ्यांची मागणी प्रतिकिलो २०० रुपये भाव हवा आहे. कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार एक किलो काजू पिकवायला १६० रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे काजूच्या पिकात मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने किलो मागे १० रुपये अनुदानाची तरतूद करून आमची चेष्टा केली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. म्हणूचच राजा उदार झाला आणि दमडी हातावर टेकवली. सरकराचा निर्णय ऐकून कोकणी मुलखातली माणसे अवाक झाली, अशी खोचक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular