27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriधोकादायक ४१ साकव वाहतुकीस बंद…..

धोकादायक ४१ साकव वाहतुकीस बंद…..

साकवांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ७९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

जिल्हा आणि तालुक्यांशी गाव, वाडीवस्ती जोडण्याचे काम साकव करतात; परंतु जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक बनल्यामुळे ते वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घेतला आहे. या साकवांच्या दुरुस्तीला ४ कोटी ७९ लाख खर्च अपेक्षित आहे. यामुळे अनेक वाडीवस्तींचा दळणवळणाच्या दृष्टीने संपर्क तुटणार आहे. ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा दऱ्याखोऱ्याचा, कडेकपारीचा जिल्हा आहे. अनेक दुर्गम भागातील वाडीवस्त्यांना जोडण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत.

मोठे वहाळ, नदीनाले, दऱ्यांवरही साकव आहेत तसेच अनेक ठिकाणी मुलांना शाळा, कॉलेजला जाण्यासाठी, दळणवळणासाठी साकवांचा वापर होतो. ग्रामीण भागात साकवांना मोठे महत्व आहे; परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ४१ साकव धोकादायक बनले आहेत. त्यामुळे वाहतुकीस हे साकव बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. म्हणून लवकरात लवकर हे साकव दुरुस्त करून वाहतुकीस खुले करावेत, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. चिपळूण तालुक्यात सर्वांत जास्त ९ साकवांचा समावेश आहे. सर्व साकवांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ७९ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES

Most Popular