27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriकोकणच्या ४८० हापूस पेट्या वाशी बाजारात

कोकणच्या ४८० हापूस पेट्या वाशी बाजारात

चार व पाच डझनच्या पेटीला ६ ते ११ हजार रुपयांपर्यंत दर.

नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमध्ये कोकणातील हापूस आंबा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. २९) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि श्रीवर्धन येथून सुमारे ३८० पेट्या दाखल झाल्या. मंगळवारी (ता.३०) शंभर पेटी आल्याचे तेथील व्यावसायिकांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक पेट्या देवगडमधील असून त्या पोठपाठ रत्नागिरी, दापोली, बाणकोटमधील पेट्या आहेत. चार व पाच डझनच्या पेटीला ६ ते ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा सुरुवातीला हापूससाठी पोषक वातावरण होते; मात्र जानेवारीत पडलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लागलेल्या मोहोरामधील उत्पादन कमी येत आहे.

जानेवारीच्या सुरवातीला रत्नागिरीमधून पहिली पेटी वाशी बाजारात रवाना झाली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून सोमवारी एकाच दिवशी ४० हून अधिक पेट्या पाठवल्या आहेत. बाणकोट आणि श्रीवर्धनमधूनही आंबा पाठवला जात आहे. दापोली, संगमेश्वर, राजापूरमधून किरकोळ आंबा वाशीमध्ये जात आहे. सर्वाधिक देवगडमधून सुमारे २५० पेटी आंबा सोमवारी बाजारात पोहचला. रत्नागिरी जिल्ह्यातून पेट्यांचे प्रमाण कमी असले तरीही १५ फेब्रुवारीनंतर यामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा वाशीमधील व्यावसायिक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘सध्या कोकणातून किरकोळ हापूस येत आहे. त्याची विक्री सुरू आहे. दरही चांगला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण तुलनेत खूप कमी आहे.’

RELATED ARTICLES

Most Popular