33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRatnagiriमहावितरणला ग्राहक मंचाचा दणका, शेतकऱ्याला लाखांचे बिल

महावितरणला ग्राहक मंचाचा दणका, शेतकऱ्याला लाखांचे बिल

मीटरचे रिडींग न घेता दर महिन्याला वेगवेगळया किंमतीची बीले पाठविली होती.

महावितरणने रिंडिंग न घेता १ लाख ५ हजारांचे बिल पाठवल्याने शेतकऱ्याने ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी ग्राहक मंचाने शेतकऱ्याच्या तक्रार अर्जावर निकाल देताना महावितरणने शेतकऱ्याला झालेल्या त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचा आदेश दिला. याबाबत सोमेश्वर येथील सुहास भास्कर पटवर्धन यांनी ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. याबाबत अॅड. अर्थव पटवर्धन यांनी तक्रारदारांची बाजू ग्राहक मंचासमोर मांडली. सोमेश्वर येथील विनयानंद लिमये यांच्या मिळकतीचे मुखत्यार असलेले सुहास पटवर्धन यांनी मिळकतीमध्ये कृषीपंपासाठी महावितरणकडे वीज जोडणी मागितली होती.

त्यानुसार त्यांना जोडणी देण्यात आली. मात्र मीटरचे रिडींग न घेता पटवर्धन यांना दर महिन्याला वेगवेगळया किंमतीची अव्वाच्या सव्वा बीले पाठविली होती. त्यामुळे पटवर्धन यांनी ७ ते १९ मे २०२१ ला ऑनलाईन तक्रार दाखल केली. विजेचा जास्त वापर होत नसताना बील जास्त कसे येते याबाबत अनेकदा तोंडी तक्रारही केली. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीसाठी महावितरण कंपनीने २० हजार ८३० युनिटचे पटवर्धन यांना १ लाख ५ हजार ३२० रुपयांचे बिल पाठविले.

तक्रारदार पटवर्धन यांनी महावितणरला मीटर बसवल्यापासून सप्टेंबर २०२१ पर्यंतचा बील भरल्याचा सर्व तपशील कर्मचाऱ्यांना दाखवला. त्यावेळी त्यांनी चुक मान्य करुन बिलामधून रक्कम ५९ हजार २६० रुपये वजा करून ४६ हजार ६० रुपये भरण्यास सांगितले. परंतु पटवर्धन यांनी ही रक्कम जास्त असल्याने बील भरण्यास नकार दिला आणि त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने महावितरणला दणका देत शेतकरी पटवर्धन यांना झालेल्या त्रासापोटी १० हजार रुपये आणि अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले. त्यांना सुधारित बील द्यावे. तसेच नवीन मीटर बसवून दयावे व सदर नवीन मीटरचा येणारा खर्च तक्रारदाराकडून घ्यावा. या आदेशाची अंमलबजावणी आदेश झाल्यापासून ४५ दिवसात करायची आहे.

RELATED ARTICLES

Most Popular