26.3 C
Ratnagiri
Tuesday, July 15, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiriचाकरमानी कोकणात होताहेत दाखल, एसटी महामंडळातर्फे ४८०० जादा बसफेऱ्या

चाकरमानी कोकणात होताहेत दाखल, एसटी महामंडळातर्फे ४८०० जादा बसफेऱ्या

जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून जादा गाड्या येण्यास प्रारंभ होणार आहे. 

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले असून लाखो चाकरमान्यांना कोकणात परत येण्याचे वेध लागले आहेत. मुंबईतून कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था केली असून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ हजार ८०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ४ सप्टेंबरपासून जादा बसफेऱ्या कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २५०० पेक्षा जास्त गाड्या येणार आहेत. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून जादा गाड्या येण्यास प्रारंभ होणार आहे.

४ ला ६००, तर ५ ला सर्वाधिक म्हणजेच ३ हजार गाड्या येणार आहेत. ६ सप्टेंबरला एक हजार, ७ ला ३०० जादा गाड्या येणार आहेत. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपाहारगृहातून पुरेशा खाद्यपदार्थांची व्यवस्था, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परतीसाठी गौरी- गणपती विसर्जनापासून म्हणजे १२ सप्टेंबरपासून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १७०० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, दोन हजारांपेक्षा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular