28.4 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeChiplunनववर्षाच्या पहिल्याच दिवशी हृदयद्रावक घटना, पाच दिवसाचे अर्भक रस्त्यावर सापडले

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हृदयद्रावक घटना, पाच दिवसाचे अर्भक रस्त्यावर सापडले

खरच माणुसकी हरवून बसले आहेत का पालक? जन्मदात्या मात्यापित्याच्या हाताने असे कृत्य घडूच कसे शकते ! यावर स्थानिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

चिपळूण शहरातील गुहागर बायपास रस्त्यालगत पाच दिवसाचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कानी आला त्यामुळे त्याने आवाजाचा कानोसा घेत पहिले असता, तिथे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्याने ताबडतोब पोलिसांना त्याची खबर दिली. या घटनेची पोलिसांनी देखील गंभीरपणे दखल घेत या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

शहरातील उक्ताड ते पाग दरम्यान असलेल्या गुहागर बायपास रस्त्यालगत एका पिराजवळ हे अर्भक आढळून आले. पाच दिवसांचा अर्भक असून एका कपड्यामध्ये गुंडाळलेल्या स्थितीत ते ठेवण्यात आले होते. या रस्त्यावरून मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका तरुणाने येणाऱ्या अर्भकाचा आवाजाच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला कामथे रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अर्भकाची प्रकृती सुस्थितीत आहे.

या घटनेचा तपास तातडीने सुरू करण्यात आला असून पोलिसांच्या पथकामार्फत याबाबतची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली. अजूनही मुलगी जन्माला आली तर तिला प्रेमाने स्वीकारणे तर दूर तर असे रस्त्यावर सोडून दिले जाते.

खरच माणुसकी हरवून बसले आहेत का पालक? जन्मदात्या मात्यापित्याच्या हाताने असे कृत्य घडूच कसे शकते ! यावर स्थानिकांमध्ये चर्चा सुरु आहे. नक्की या मुलीचे मायबाप कोण आहेत कि अनैतिक संबंधातून जन्म घेतलेले मूल असे वाऱ्यावर सोडून दिले गेले आहे! याबाबत पोलीस तपास करत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी हृदयद्रावक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular